औरंगाबाद विभागात कापसाची ७ लाख क्‍विंटलवर खरेदी

Purchase of cotton at 7 lakh quintals
Purchase of cotton at 7 lakh quintals

औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या औरंगाबाद विभागांतर्गत ९ केंद्रांवरून आजपर्यंत ७ लाख १७ हजार ६७५ क्‍विंटल कापसाची हमी दराने खरेदी करण्यात आली. चुकाऱ्यासाठी खाते देताना येस बॅंक संलग्न आयएफसी कोडची खाती दिल्याने अनेक शेतकऱ्यांना विकलेल्या कापसाचे चुकारे देण्यामध्ये अडथळा आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा कापूस पणन महासंघाची विक्रमी कापूस खरेदीकडे वाटचाल सुरू आहे. औरंगाबाद विभागीय कार्यालयांतर्गत कापूस उत्पादक पणन महासंघाकडून २ मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विभागांतर्गत औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबविण्यात आली. आता ही कापूस खरेदी पुन्हा १६ मार्चपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. 

साठवणुकीच्या प्रश्‍नावरून २ मार्चपासून खरेदी थांबविण्यात आली, तरी त्या वेळी जिनिंगच्या कॅंपसमध्ये पंचनाम्यामध्ये आलेल्या वाहनांचे मोजमाप सुरूच होते. त्यामध्ये होळीच्या आलेल्या सुट्ट्यांनी खोडा घातला. आजघडीला खामगाव फाटा व श्रीरामपूर येथील केंद्रावरील वाहनांचे मोजमाप सुरू होते. साठवणुकीचा अंदाज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होणाऱ्या केंद्रांमध्ये खामगाव फाटा व श्रीरामपूर येथील कापूस खरेदी सर्वांत शेवटी सुरू होईल, हे स्पष्ट आहे.  

खरेदी केलेल्या ७ लाख १७ हजार ६७५ क्‍विंटलपैकी ६ लाख ६४ हजार क्‍विंटल कापूस प्रत्यक्ष जिनिंग झाला. त्यापासून १ लाख ३४ हजार ९२० गाठी तयार झाल्या. तर, जवळपास ५३ हजार क्‍विंटल कापूस अजून जिनिंग होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

नव्याने खाते क्रमांक द्यावा

२९ फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या कापसाच्या चुकाऱ्यासाठीची यादी महसंघाकडून पाठविण्यात आली. परंतु ती यादी परत आली आहे. शेतकऱ्यांनी येस बॅंकेचे खाते दिल्याने कापसाच्या चुकाऱ्यात अडथळा निर्माण झाला आहे. आता नव्याने राष्र्टीयीकृत बॅंकेचा आयएफसी कोड असलेले खाते दिल्यानंतरच शेतकऱ्यांचा चुकाऱ्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com