Agriculture news in Marathi Purchase of cotton at low rates from traders in the town | Agrowon

नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प दराने खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर आहे. मात्र कापसाला दर्जा नसल्याचे कारण पुढे करत तीन ते साडेतीन हजार रुपये दराने बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे खरेदी सुरू आहे. याबाबीकडे बाजार समितीही दुर्लक्ष करत असल्याने रविवारी (ता. २५) शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले.

नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर आहे. मात्र कापसाला दर्जा नसल्याचे कारण पुढे करत तीन ते साडेतीन हजार रुपये दराने बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे खरेदी सुरू आहे. याबाबीकडे बाजार समितीही दुर्लक्ष करत असल्याने रविवारी (ता. २५) शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू असताना त्याकडे बाजार समित्या आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. नगर जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. पावसामुळे पीक चांगले आले असले, तरी गेल्या दीड महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हाती पडणारे पीक पदरात पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, मध्यंतरी पावसाने उघडीप दिली त्या काळात बऱ्यापैकी कापसाची वेचणी झाली. जिल्ह्यात अजून कोठेही सरकारी खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी गरजेनुसार कापसाची बाजारात विक्री करतात.

श्रीगोंदा तालुक्यातही आता कापसाचे क्षेत्र वाढत आहे. रविवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर बरेच शेतकरी श्रीगोंदा बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आले होते. सकाळी सुरुवातीच्या काळात कापसाला पावणेपाच हजारापर्यंत व्यापाऱ्यांनी दर दिला. मात्र दुपारी अचानक दर पाडून ते तीन ते साडेतीन हजारांवर आणले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीचे गेट बंद आंदोलन करून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या लुटीचा निषेध केला.

बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याची सर्रास लूट होत असताना बाजार समितीचे पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बाजार समिती प्रशासनाने दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यांत कापूस उत्पादकांत व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट होत असताना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

कापूस उत्पादकांना आधीच पावसाने जेरीस आणले आहे. यंदा उत्पादनात मोठी घट होत असताना, व्यापारी कापसाची अल्प दरात खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांची लूट होत असताना बाजार समिती प्रशासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे श्रीगोंदा बाजार समितीत शेतकऱ्यांनी गेटबंद आंदोलन केले.
- भाऊसाहेब मांडे, तालुका अध्यक्ष, रयतक्रांती संघटना, श्रीगोंदा, जि. नगर


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...