Agriculture news in marathi, Purchase of cotton at a lower rate than guaranteed | Agrowon

हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीच्या लागवडीतील कापासाची आवक सुरू झाली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ३५०० ते ४ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहे. यंदा कापसाला धाग्याच्या लांबीनुसार प्रतिक्विंटल ५ हजार २५५ ते ५ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा दीड ते दोन हजारांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीच्या लागवडीतील कापासाची आवक सुरू झाली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ३५०० ते ४ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहे. यंदा कापसाला धाग्याच्या लांबीनुसार प्रतिक्विंटल ५ हजार २५५ ते ५ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा दीड ते दोन हजारांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ तसेच सीसीआयतर्फे कापुस खरेदीची सुरुवात दिवाळीनंतर होईल. यंदा खुल्या बाजारातील दर कमी असल्यामुळे शासकीय खरेदीस प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

यंदा (२०१९-२०) च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणीत २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. जून महिन्याच्या सुरवातीला लागवड केलेल्या कपाशीची वेचणी सुरू आहे. परतीच्या पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजून पिवळा पडला आहे. आर्थिक अडचणीतील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. परंतु बाजार समित्यांअंर्गत जिनिंग कारखानदाराकडून अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. किरकोळ व्यापाऱ्यांची खरेदी सुरू आहे. कापूस भिजल्याचे कारण सांगत व्यापारी कमी दर देत आहेत. 

यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५ हजार २५५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. आता दिवाळी नंतरच नोव्हेंबर महिन्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू होऊन हमीदराने कापूस खरेदी केली जाईल, असे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...