Agriculture news in Marathi Purchase of cotton through 25 ginning in Amravati | Agrowon

अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

अमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला गती यावी याकरिता आठ केंद्रावरील जिनींगची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतरही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

अमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला गती यावी याकरिता आठ केंद्रावरील जिनींगची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतरही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

कापूस खरेदी विषयक आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी खरेदी संदर्भातील अडचणींची माहिती घेतली. काही जिनींग सुरू झाल्यास त्यासोबतच मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास कापूस खरेदीची गती वाढेल, असे त्यांना सांगण्यात आले.

त्यानुसार जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी दहा कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना फिल्डवर नेमण्यात आले. त्यामुळे सात आणखी जिनींग सुरू होऊ शकल्या. पूर्वीची १८ जीनची संख्या आता २५ वर पोचली आहे. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येत आहे.

आत्तापर्यंत २२ हजार २०४ शेतकऱ्यांकडून सुमारे सहा लाख २५ हजार क्‍विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. जिल्ह्यात एकूण आठ केंद्र असून त्यातील धामणगाव येथील केवळ एक सीसीआयचे आहे. उर्वरित पणन महासंघाची केंद्र आहेत. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन खरेदीच्यावेळी केले जाते, अशी माहिती देण्यात आली.

कापूस खरेदी गतिमान व्हावी याकरिता शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेत जिनींगची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला गती येत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- यशोमती ठाकूर,
महिला व बालविकास मंत्री


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...