Agriculture news in Marathi Purchase of exportable grapes at discounted rates | Agrowon

निर्यातक्षम द्राक्षांची दर पाडून खरेदी

मुकूंद पिंगळे
शुक्रवार, 14 जानेवारी 2022

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने हजारो द्राक्ष बागायतदारांच्या उपस्थितीत उत्पादन खर्चावर आधारित दहा टक्के नफा गृहीत धरून दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जानेवारी महिन्याचा दर ८२ रुपये आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने हजारो द्राक्ष बागायतदारांच्या उपस्थितीत उत्पादन खर्चावर आधारित दहा टक्के नफा गृहीत धरून दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जानेवारी महिन्याचा दर ८२ रुपये आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या निर्णयाला हरताळ फासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सुरू असलेल्या शिवार खरेदीत ५५ रुपयांपर्यंत खरेदी होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन खर्चावर आधारित १० टक्के नफा हा धागा पकडून निर्यातीच्या सर्व बाजारपेठांसाठी दरासंबधी निर्णय घेत उत्पादन खर्च व त्यावर नफा गृहीत धरून जानेवारीत प्रतिकिलो ८२, फेब्रुवारीत ७१ व मार्चसाठी ६२ रुपये हा किमान दर निश्‍चित केला आहे. त्यामध्ये विविध वाण, रंग, आकार, गुणवत्ता हे निकष गृहीत धरून या निश्‍चित दरापेक्षा अधिक दरानेच विक्री करण्यात यावी, असा सर्वानुमते निर्णय झाला. या निश्‍चित दराच्या खाली कुणीही विक्री करणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे संघाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

 शेतकऱ्यांनी सांगितली खरेदीची स्थिती
कृषी विभागाच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातून १ नोव्हेंबर २०२१ ते १२ जानेवारी २०२२ पर्यंत नाशिक जिल्ह्यातून ६०२३ टन द्राक्ष निर्यात झालेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष मालाची काढणी करताना निर्यातदाराच्या प्रतिनिधीकडून प्रत्यक्ष माहिती घेऊन व उपस्थितीत गुणवत्ता, साखर तपासून मालाची काढणी केली जाते. माल पॅक हाउसला गेल्यानंतर माल नाकारण्याचे प्रकार काही ठरावीक निर्यातदार करत असल्याच्या तक्रारी आहेत. मालाची काढणी सुरू करताना प्रतिकिलो ८२ रुपये दर ठरविले जातात. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर ‘मागणी घटली, दर पडले’ असे सांगून कोंडी केली जात आहे. युरोपसाठी सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ७० रुपयांच्या जवळपास तर रशियासाठी ५५ रुपयांच्या आसपास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काढणी सुरू झाल्यानंतर एकाच दिवसात बाजार कसे पडतात, मग वाढल्याचे का दाखवीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सध्या तुलनेत रंगीत वाणांना मागणी तर सफेद वाणांना अडचणी येत असल्याची स्थिती आहे.

द्राक्ष बागायतदार संघाचा निर्णय होण्यापूर्वी रशियामध्ये टेंडर भरून दर ठरविल्याने सध्या ठरलेल्या दराप्रमाणे दर देणे शक्य नसल्याचे काही निर्यातदार सांगतात. मात्र संघाने घेतलेला निर्णय रशियातील खरेदीदारांना कळवून नवीन दर वाढून घ्यावेत, अशी मागणी आहे. ठरलेल्या दराखाली व्यवहार नको, अशी भूमिका आहे. यावर बैठक घेऊन दरासंबंधी समिती आवाज उठवेल. शेतकऱ्यांनी ठरलेल्या दराखाली माल देऊ नये; अन्यथा नुकसान वाढणार आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दर देऊन दिलासा द्यावा.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...