देवगावच्या शेतकऱ्यांकडून जुन्या दरात खतखरेदी

औरंगाबाद : रासायनिक खताच्या किमती वाढणार हे कळल्यानंतर व एका कंपनीची खते अजूनही जुन्याच दराने घेण्याची संधी असल्याचे लक्षात आले.
Purchase of fertilizer at old rates from farmers of Devgaon
Purchase of fertilizer at old rates from farmers of Devgaon

औरंगाबाद : रासायनिक खताच्या किमती वाढणार हे कळल्यानंतर व एका कंपनीची खते अजूनही जुन्याच दराने घेण्याची संधी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती खते थेट कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क करून गावात पोहच घेण्याचे काम पैठण तालुक्‍यातील देवगावच्या शेतकऱ्यांनी केले आहे.

गतवर्षी लॉकडाउनच्या काळात कृषी विभागाकडून थेट बांधावर खत योजना आली होती. या योजनेतही देवगाव येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन कृषी विभागाच्या समन्वयातून जवळपास १०० टन १०:२६:२६ व युरिया खताची खरेदी करून शेतीची रासायनिक खताची गरज भागविली होती.

यंदा त्याच्या पुढे एक पाऊल टाकत खताचे दर वाढणार हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ‘जय जवान जय किसान शेतकरी मंडळा’द्वारे थेट गावात खत उत्पादक कंपनीकडून २० टन १०:२६:२६ या मिश्र खतांची खरेदी केली. 

जवळपास ३५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या खताची खरेदी केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी दिली. जुन्या दरात ११७५ रुपये प्रति बॅगने मिळालेल्या या खताबरोबरच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरासाठी १ लाखाचा विमाही मिळाला. इफ्कोचे सुनील कुलकर्णींनी सहकार्य केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com