Purchase five lakh 71 thousand quintals of cotton in Nanded, Hingoli, Parbhani
Purchase five lakh 71 thousand quintals of cotton in Nanded, Hingoli, Parbhani

नांदेड, परभणी, हिंगोलीत ५ लाख ७१ हजार क्विंटल कापूस खरेदी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत या वर्षीच्या खरेदी हंगामात गुरुवार (ता. २६)पर्यंत राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण ५ लाख ७१ हजार ७५१ क्विंटल कापूस खरेदी झाली.

यामध्ये कापूस उत्पादक पणन सहकारी महासंघाकडून ९४ हजार ४९५.३६ क्विंटल, सीसीआयतर्फे १ लाख ४९ हजार १२ क्विंटल, खासगी व्यापाऱ्यांकडून ३ लाख ३३ हजार २४२ क्विंटल एवढ्या कापूस खरेदीचा समावेश आहे.यंदा खुल्या बाजारातील कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्या कापूस खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. या तीन जिल्ह्यांत महासंघाची एकूण पाच खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. परंतु, ढगाळ वातावरणामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड येथील खरेदी बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेडमध्ये १ लाख १५ हजार क्विंटल खरेदी नांदेड जिल्ह्यातील पणन महासंघाच्या भोकर आणि तामसा येथील केंद्रावर ९५९ शेतकऱ्यांचा १९ हजार ८१२.७५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयतर्फे नांदेड, नायगाव, कुंटूर येथील केंद्रांवर ६ हजार ८५ क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्याकडून भोकर आणि धर्माबाद येथे ८९ हजार १८६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १ लाख १५ हजार ८३.७५ क्विंटल कापूस खरेदी झाली.

परभणीत ४ लाख १७ हजार क्विंटल खरेदी परभणी जिल्ह्यात पणन महासंघाकडून पाथरी आणि गंगाखेड येथील केंद्रांवर २ हजार १८४ शेतकऱ्यांचा ६६ हजार ७८८.९६ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयतर्फे सेलू, मानवत, जिंतूर, पूर्णा, ताडकळस येथील १ लाख १० हजार १७५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, बोरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत खासगी व्यापाऱ्यांनी २ लाख ४० हजार १३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४ लाख १७ हजार ९३.९६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.

हिंगोलीत ४४ हजार क्विंटल खरेदी जिल्ह्यात हिंगोली येथे पणन महासंघातर्फे ३४२ शेतकऱ्यांचा ७ हजार ८९६.५५ क्विंटल खरेदी करण्यात आला. सीसीआयकडून हिमायतनगर, जवळा बाजार केंद्रावर ३२ हजार ७५२ क्विंटल खरेदी करण्यात आला. हिंगोली, आखाडा बाळापूर, जवळा बाजार येथे खासगी व्यापाऱ्यांकडून ३ हजार ९२६ क्विंटल खरेदी झाली. एकूण ४४ हजार ५७४.५५ क्विंटल कापूस खरेदी झाली.

पणन महासंघाची कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)
जिल्हा खरेदी केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
नांदेड १९८१२.८५ ९५९
परभणी ६६७८८.९६ २१८४
हिंगोली ७८९६.५५ ३४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com