लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९ शेतकऱ्यांकडील ४२ हजार ९५० क्विंटल ३० किलो हरभऱ्याची ५१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली.
Purchase of forty three thousand quintals of gram in Latur district
Purchase of forty three thousand quintals of gram in Latur district

लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९ शेतकऱ्यांकडील ४२ हजार ९५० क्विंटल ३० किलो हरभऱ्याची ५१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली.

हरभरा खरेदीसाठी लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, औसा, चाकूर, अहमदपूर, रेणापूर, हलकी ,भोपणी, हलसी, लोणी, शिरूर ताजबंद, साताळा, सेलू, देवनी, शिंदगी, खरोळा आधी १६ केंद्रावर नोंदणी व खरेदी सुरू करण्यात आली होती. 

या १६ केंद्रावरून १६ हजार १०८ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंदणी केली होती. त्यापैकी १४८८३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले होते. त्यांपैकी २७५९ शेतकऱ्यांकडील ४२ हजार ९५० क्विंटल ३० किलो हरभरा खरेदी करण्यात आला. त्याची एकूण किंमत २१ कोटी ९० लाख ४६ हजार ५३० रुपये आहे. ३८ हजार ५३९ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला, तर ४४११ क्विंटल ३० किलो हरभरा गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे, अशी माहिती लातूरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com