राज्याने शेतकऱ्यांकडील फळे खरेदी करावीत, केंद्र निम्मा खर्च उचलेल : केंद्रीय कृषिमंत्री तोमर

पुणे: महाराष्ट्रात फळांचे नुकसान होत आहे, याची कल्पना केंद्र सरकारला आहे. नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने ही फळे खरेदी करावीत, यात जो खर्च येईल, त्यातील निम्मा वाटा केंद्र सरकार उचलेल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत दिले आहे.
राज्याने फळे खरेदी करावीत, केंद्र निम्मा खर्च उचलेल : केंद्रीय कृषिमंत्री तोमर
राज्याने फळे खरेदी करावीत, केंद्र निम्मा खर्च उचलेल : केंद्रीय कृषिमंत्री तोमर

पुणे : महाराष्ट्रात फळांचे नुकसान होत आहे, याची कल्पना केंद्र सरकारला आहे. नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडील ही फळे खरेदी करावीत, यात जो खर्च येईल, त्यातील निम्मा वाटा केंद्र सरकार उचलेल, असे आश्‍वासन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या बैठकीत दिले आहे. राज्य कृषिमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनीही माहिती दिली.  केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी सद्यःस्थितीतील महाराष्ट्रातील फळांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी (ता.९) व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, श्री. पटेल, माजी आमदार अजित गोगटे, द्राक्ष उत्पादक संघाचे सोपान कांचन, चिकू उत्पादक संघाचे विनायक बारी आदी उपस्थित होते. यावेळी आंबा, केळी, संत्रा, मोसंबी, चिकू, द्राक्ष, पपई आदी फळांच्या सद्यःस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. फळ संघांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या समोर मांडल्या. केंद्र सरकार घेत असलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले,‘‘फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत  केंद्र सरकार गंभीर आहे. यासंदर्भात काल (बुधवारी) आम्ही सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली. संबंधित राज्यातील फळांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, ती राज्य सरकारांनी स्वतः खरेदी करावीत, केंद्र सरकार यातील निम्मा वाटा उचलेल असे मंत्र्यांना सांगितले आहे.’’  ‘‘देशभरातील परिवहनसाठी सुधारणा आणणार आहोत. याकरिता ३५ लाख ट्रक आम्ही माल वाहतुकीसाठी निर्धारित केले आहेत. माल वाहतुकीसाठी ते सर्वांना उपलब्ध व्हावे याकरिता स्वतंत्र ॲप तयार केले जात आहे. शेतकऱ्यांनाही या ॲपचा लाभ बाजार पेठांत माल वाहतुकीसाठी घेता येईल. याशिवाय ई-नामचाही वापर शेतकऱ्यांनी करावा. गाव-शेती मजबूत राहिली, तर जगात आम्ही कुणाशही सामना करू शकतो,’’ असे मंत्री तोमर म्हणाले. यावेळी त्यांनी फुल शेतीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची कल्पना आपल्याला असल्याचे स्पष्ट केले. कोल्ड स्टोरेज सुविधेचा विचार केला जाईल. देशातील प्रक्रिया उद्योग पुरर्ववत सुरू होण्यासाठी तातडीने पाऊल उचलणार आहोत. ग्राहक ते शेतकरी ही नाळ मजबूत करण्यासाठी जे-जे करता येईल, ते केले जाईल. तसेच केंद्र सरकारने कृषी उत्पादन, वाहतूक, यंत्रे, निविष्ठा आदींसाठी लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या सवलतींची माहिती मंत्री तोमर यांनी दिली.    किसान रेल सुरू करण्यासाठी प्रयत्न  सध्या ६०० रेल्वे द्वारे देशभरात मालवाहतूक केली जात आहे. शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जात आहे, मात्र, यासाठी प्रलंबित किसान रेल वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सूचना पाठवा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काही सूचना असल्यास त्या पाठवाव्यात असे आवाहन केले. याकरिता पाशा पटेल यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, माझ्या व्हॉट्‌सअप नंबरवर या सूचना द्याव्यात अशी माहिती श्री. पटेल यांनी दिली आहे.    श्री. पटेल : ९३७००५५७८६   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com