जळगावातील शासकीय धान्य खरेदी रखडतच

गोदामांची अडचण असल्याने जामनेर, जळगाव, भडगाव येथे खरेदी केंद्रे सुरू नाहीत. नोंदणी केलेल्या कमाल शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी झाली आहे. मक्‍याची आवक मात्र नाही. - परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन
जळगावातील शासकीय धान्य खरेदी रखडतच
जळगावातील शासकीय धान्य खरेदी रखडतच

जळगाव : जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला अपेक्षित प्रतिसाद यंदा मिळाला नाही. सोयाबीन, मका व ज्वारीचे दर बाजारात बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रात ज्वारीची आतापर्यंत फक्त २० हजार क्विंटल, सोयाबीनची ४०० क्विंटल खरेदी झाली. मक्‍याची आवक झाली नाही. केंद्रातील ज्वारी व मक्‍याची खरेदी येत्या ३१ डिसेंबर रोजी बंद होईल, अशी माहिती मिळाली.

पाचोरा, अमळनेर व जळगावात सोयाबीनची खरेदी झाली. २३ डिसेंबर रोजी अमळनेर, पाचोरा व जळगाव येथे सुरू केलेले उडीद, मूग खरेदी केंद्र बंद झाले आहेत. उडदासह मुगाची मिळून सुमारे १४ हजार क्विंटल खरेदी झाली. सोयाबीनची खरेदी ५ जानेवारीपर्यंत निर्देशित तीन केंद्रांवर सुरू राहील. 

खरेदीची मुदत संपत येऊनही शासनाने जामनेर, जळगाव, भडगाव व शेंदूर्णी येथे ज्वारी आणि मका खरेदीसाठी केंद्र सुरू केले नाहीत. सध्या ज्वारी व मका खरेदीसंबंधी पाचोरा, अमळनेर, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, धरणगाव, पारोळा व एरंडोल येथे केंद्रे सुरू आहेत. इतर चार केंद्रे गोदामाच्या अडचणीमुळे सुरू झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सोयाबीनचीही किरकोळ आवक झाली. ज्वारीची मात्र मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार क्विंटल अधिक खरेदी झाली, असा दावा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com