Agriculture news in marathi Purchase of grain farming, market closed in Khandesh | Agrowon

खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट बंदच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे. धुळे, जळगाव व इतर प्रमुख बाजार समित्यांमधील धान्य मार्केटयार्डही अडतदारांच्या नकारघंटेमुळे बंद आहेत. यामुळे धान्य घरीच साठविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे. धुळे, जळगाव व इतर प्रमुख बाजार समित्यांमधील धान्य मार्केटयार्डही अडतदारांच्या नकारघंटेमुळे बंद आहेत. यामुळे धान्य घरीच साठविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

सध्या गहू, ज्वारी, दादरची मळणी वेगात सुरू आहे. गव्हाची ५० ते ६० टक्के क्षेत्रातील मळणी पूर्ण झाली आहे. तर, दादरची, हरभऱ्याची मळणीदेखील पूर्ण झाली आहे. परंतु, मार्केटयार्ड बंद असल्याने, लिलाव होत नसल्याने धान्याची विक्री बंद आहे. धुळे बाजार समितीने शेतकऱ्यांनी कुठलेही धान्य विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केले आहे.या ठिकाणी धान्याची खरेदी केव्हा सुरू होईल? हेदेखील प्रशासनाने सांगितलेले नाही. 

जळगाव बाजार समितीमध्ये मागील १० ते १२ दिवसांपासून धान्याची खरेदी बंद आहे. अशीच अवस्था धुळ्यातील दोंडाईचा, शिरपूर, जळगावमधील अमळनेर, चोपडा या बाजार समित्यांत आहे. आपली प्रशासनाकडून अडवणूक केली जाते, हमाल -माथाडींना प्रशासनाकडून त्रास दिला जातो, बाजार समितीत कुणी मजूर यायला तयार नाही, अशी कारणे अडतदार, व्यापारी सांगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल घरीच साठवावा लागत आहे. 

शेतमाल विक्रीअभावी शेतकरी अडचणीत 

खानदेशात मका, हरभऱ्याची शिवार खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु, ती देखील बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्रीची अडचण आहे. मळणीसाठी खर्च लागला. शेताची मशागत करण्यासह इतर बाबींसाठीही पैसे लागतील. पीक कर्ज वितरण बंद आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांची ही समस्या सोडविली जावी, अशी मागणी शेतकरी छगन पाटील (शिरपूर) यांनी केली. 
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...