लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवरून हमीभावातील तूर, हरभऱ्याची खरेदी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीचे नियम पाळून सर्व केंद्रांवर तूर व हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व केंद्रांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने सर्व केंद्रांवर नोंदणी व खरेदी सुरू आहे. - राजेश हेमके,जिल्हा माकेंटिंग अधिकारी लातूर
Purchase of green gram, Tur from 12 centers in Latur district
Purchase of green gram, Tur from 12 centers in Latur district

लातूर : जिल्ह्यातील एकूण १२ खरेदी केंद्रांवरून तूर व हरभऱ्याची हमी दराने खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७७२० शेतकऱ्यांकडील ७३ हजार ४७५ क्विंटल १५ किलो तुरीची हमी दराने खरेदी करण्यात आली आहे. 

तूर व हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्ह्यात १२ केंद्र सुरू करण्यात आली. यामध्ये लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, हलकी, शिरूर, भोपानी देवणी, लोणी, सटाला, शिरूर ताजबंद या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवरून तुरीची खरेदी करण्यासाठी २९ हजार ९१७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी आतापर्यंत ७७२३ शेतकऱ्यांकडील ७३ हजार ४७५ क्विंटल १५ किलो तुरीची खरेदी करण्यात आली. 

खरेदी केलेल्या तुरीपैकी ५५०३१ क्विंटल तूर गोडाऊनला पाठवण्यात आली. तर, १८ हजार ४४४ क्विंटल १५ किलो तूर अद्याप गोडाऊनला पाठविणे बाकी आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत तूर खरेदीची प्रक्रिया सुरू राहील. दुसरीकडे हरभऱ्याच्या हमी दराने खरेदीसाठी जिल्ह्यातील २३ हजार १५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी तीन केद्रांवर नोंदणी केलेल्या ९८ शेतकऱ्यांकडून १०२७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यलयातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com