जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर मक्याची खरेदी

जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी सुरू खरेदी केंद्रे सुरू केली. या केंद्रांत २६५ शेतकऱ्यांकडील १० हजार ३५८ क्‍विंटल ५० किलो मक्याची खरेदी करण्यात आली.
Purchase of maize at ten thousand quintals in Jalna district
Purchase of maize at ten thousand quintals in Jalna district

जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी सुरू खरेदी केंद्रे सुरू केली. या केंद्रांत २६५ शेतकऱ्यांकडील १० हजार ३५८ क्‍विंटल ५० किलो मक्याची खरेदी करण्यात आली,’’ अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली. 

जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत १८५० रुपये प्रतिक्‍विंटल दराने मका खरेदीसाठी ७ केंद्र सुरू करण्यात आली. यामध्ये जालना, अंबड, तिर्थपूरी, मंठा, भोकरदन, जाफराबाद, परतूर आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या केंद्राचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवरून १३३३ शेतकऱ्यांनी आपली मका किमान आधारभूत किमतीने खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली. त्यात जालना केंद्रावरील १८६, भोकरदन ३१४, जाफराबाद केंद्रावरील ८३३ शेतकऱ्यांचा समावेश होता. 

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जालना केंद्रावरील १४१, भोकरदन १८० व जाफराबाद केंद्रावरील ७६४ शेतकरी मिळून १०८५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी जालना केंद्रावरील ७०, भोकरदन केंद्रावरील २२, जाफराबाद केंद्रावरील १७३ मिळून २६५ शेतकऱ्यांनी आणलेला मका किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आला. त्यात जालना केंद्रातील २३६७, भोकरदन ९९८ तर जाफराबाद केंद्रावरील ६९९३ क्‍विंटल ५० किलो मक्‍याचा समावेश असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

सोयाबीन, मूगाला बाजारात बरा दर 

जालना जिल्ह्यात उडीद, मुग व सोयाबीन या तीनही पिकांच्या हमी दराने खरेदीसाठी ७ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रांवरून उडदासाठी २४, मूगासाठी ९०, तर सोयाबीनसाठी ४४६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. परंतु, सोयाबीन, उडीद, मुगाच्या हमी दराने खरेदीला प्रतिसादच मिळाला नाही. बाजारात मिळत असलेल्या बऱ्या दरामुळे खरेदीला प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com