Agriculture news in marathi; Purchase moisture-based beans at low rates | Page 2 ||| Agrowon

आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

धामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. परंतु, त्यानंतरही शासकीय खरेदी सुरू झाली नाही. परिणामी, आर्द्रता अधिक असल्याचे कारण देत बाजारात कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. 

धामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. परंतु, त्यानंतरही शासकीय खरेदी सुरू झाली नाही. परिणामी, आर्द्रता अधिक असल्याचे कारण देत बाजारात कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. 

शासनाने सोयाबीनला या हंगामासाठी ३७१० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मध्यप्रदेशात संततधार पावसाचा सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला अच्छे दिन येत दर चार हजाराच्या पार जाण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, बाजार समितीमध्ये सद्यःस्थितीत सोयाबीनला हमीभाव मिळणेही दुरापास्त झाल्याची स्थिती आहे. जुन्या सोयाबीनची खरेदी ३६०० ते ३८०० रुपये क्‍विंटलने होत आहे. नव्या सोयाबीनला मात्र २९०० ते ३२९० रुपये क्‍विंटलचाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. व्यापारी कमी दरात खरेदी करीत असताना नाफेडने मात्र यात अद्यापही हस्तक्षेप केला नाही.

नाफेडने हमीभाव केंद्र सुरू केल्यास बाजारात तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. नाफेडच्या खरेदीकरिता आधी नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल आणण्याविषयी एस.एम.एस.व्दारे कळविण्यात येते. या साऱ्या प्रक्रियेला  बराच कालावधी लागतो. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया तरी नाफेडने आत्तापासून सुरू करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. 

सोयाबीन काढणीवर मोठा खर्च
सोयाबीन काढणीची मजुरी एकरी २५०० रुपये आहे. मजुरामार्फत काढणीनंतर मळणीसाठी २०० रुपये पोत्याप्रमाणे आकारणी होते. अशाप्रकारे मोठा खर्च पिकाच्या व्यवस्थापनावर होतो. 

       
 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...