Agriculture news in marathi Purchase of more than seven thousand quintals of cotton from Marketing Federation in Jalgaon | Agrowon

जळगावात पणन महासंघाकडून सात हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

जळगाव ः जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू आहे. एकूण सुमारे सात हजार क्विंटल कापूस विविध केंद्रांमध्ये खरेदी करण्यात आला आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कापूस महामंडळाची (सीसीआय) नोडल संस्था म्हणून पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू आहे. एकूण सुमारे सात हजार क्विंटल कापूस विविध केंद्रांमध्ये खरेदी करण्यात आला आहे. 

कासोदा (ता. एरंडोल), धरणगाव, दळवेल (ता. पारोळा), पारोळा आदी पाच ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे. दर्जानुसार कापसाला ५३५० व ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. एका केंद्रात रोज फक्त २० वाहनांमधील कापसाची खरेदी व पुढील प्रक्रिया केंद्रात केली जात आहे. मागील तीन दिवसांत रोज दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसंबंधी नोंदणी केली आहे, त्यांच्याच कापसाची खरेदी केली जात आहे. कापूस विक्रीस आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना टोकन दिले जात आहेत. यामुळे केंद्रात गर्दी कमी होत असून, कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर राखणेही शक्‍य होत आहे. 

अमळनेरचे केंद्र कोरोनामुळे बंद 
अमळनेर (जि. जळगाव) येथे कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने तेथे खरेदी केंद्र पणन महासंघाने सुरू केलेले नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी पारोळा येथील केंद्रात कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु अमळनेरचे केंद्रही सुरू करावे. सुरक्षित अंतर राखले जाईल. शेतकरी सावधगिरी बाळगत आहेत. अधिकारी, प्रशासन व केंद्रधारक कारखानदार यांनी सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतील, त्या भागातील खरेदी बंद होवू शकते. तूर्त खरेदी सुरू आहे, अशी माहिती महासंघाच्या सूत्रांनी दिली. 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...