नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदी
जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या खरेदीच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ८२ हजार १९२ क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याची किंमत ३४ कोटी ३ लाख ३५ हजार २७२ रुपये आहे.
भंडारा : जिल्ह्यात आधारभूत दराने धान खरेदीसाठी ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या खरेदीच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ८२ हजार १९२ क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याची किंमत ३४ कोटी ३ लाख ३५ हजार २७२ रुपये आहे.
जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला पहिल्या टप्प्यात ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७८ केंद्रांचे उद्घाटन झाले असून, ७३ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ८२ हजार १९२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील ५९१५ शेतकऱ्यांनी आपला धान विकला असून, त्याची किंमत ३४ कोटी ३ लाख ३५ हजार २७२ रुपये आहे. धान विक्री केलेल्या एकाही शेतकऱ्याला अद्यापपर्यंत चुकारे मिळाले नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत चुकारे मिळतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
१ हजार ८६८ रुपये हमीभाव सोबतच सातशे रुपयांचा बोनस या प्रमाणे शेतकऱ्यांना चुकारे केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे यावर्षी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खरेदी केली जात आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना नोंदणीनंतर देखील धान्य विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. धान केंद्रावर देखील त्यांना वाईट अनुभव आले. या वर्षी मात्र तशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुंबई येथे आठवडाभरापूर्वी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित होते.
तालुकानिहाय धान खरेदी (क्विंटलमध्ये)
- लाखनी ३९७७५
- भंडारा १७५३७
- मोहाडी २५५०६
- तुमसर २२४६५
- लाखांदूर ३३०९९
- पवनी १५६२५
- साकोली २८१८३
- 1 of 1028
- ››