Agriculture news in marathi Purchase of six lakh quintals of cotton in the State | Page 2 ||| Agrowon

राज्यात सहा लाख क्‍विंटल कापसाची खरेदी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

अमरावती ः शेतकऱ्यांच्या वाढत्या रेट्यामुळे अखेर राज्यातील खरेदी केंद्रांची संख्या वाढवित ती ६२ पर्यंत नेण्यात आली आहे. एकट्या राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने ६ लाख ६२ हजार २४७ क्‍विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

अमरावती ः शेतकऱ्यांच्या वाढत्या रेट्यामुळे अखेर राज्यातील खरेदी केंद्रांची संख्या वाढवित ती ६२ पर्यंत नेण्यात आली आहे. एकट्या राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने ६ लाख ६२ हजार २४७ क्‍विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

राज्यात शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसामुळे रणकंदन होत आहे. तब्बल ९५ ते १०० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचा दावा कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक करीत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे खरेदीची गती मंद असल्याने हा कापूस केव्हा खरेदी होईल, अशी विवंचना देखील आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी होत होती. 

राज्य सहकारी कापूस पणन महासंघाकडील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे केंद्रांची संख्या वाढविणे शक्‍य होत नव्हते. त्यानंतर आता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना कापूस ग्रेडींग व इतर प्रक्रियेसंबंधी माहिती देत त्यांच्या माध्यमातून खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे प्रस्तावित आहे. कापूस पणन महासंघाने राज्यात ६२ केंद्राच्या माध्यमातून ९८ जिनींगस्थळी खरेदी चालविली आहे. याव्दारे ६ लाख ६२ हजार २४७ क्‍विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून ३० एप्रिल पर्यंतच्या कापसाचे चुकारेही करण्यात आले आहेत. 

सध्या ६२ केंद्राच्या माध्यमातून ९८ जिनींगवर खरेदी होत आहे. लवकरच केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात ही केंद्र वाढतील. 
- अनंतराव देशमुख, 
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...