उस्मानाबाद जिल्ह्यात साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ११ हमी दर खरेदी केंद्रांवरून जवळपास ४ हजार ४९४ क्विंटल २९ किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
Purchase of tour four and a half thousand quintals in Osmanabad district
Purchase of tour four and a half thousand quintals in Osmanabad district

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ११ हमी दर खरेदी केंद्रांवरून जवळपास ४ हजार ४९४ क्विंटल २९ किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. अशा ५६८ पैकी २४९ शेतकऱ्यांना त्यांच्या तुरीचे पैसेही अदा केले आहेत, अशी माहिती उस्मानाबाद डीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

जिल्ह्यात हमी दराने तूर खरेदी करण्यासाठी ११ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये उस्मानाबाद, ढोकी, कळंब, भूम, तुळजापूर, लोहारा, कानेगाव, गुंजोती, दस्तपूर, नळदुर्ग, वाशी पारगाव या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवरून हमी दराने तुरीची खरेदी करण्यासाठी ५ हजार २९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०२२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एसएमएस पाठवण्यात आले. त्यांपैकी ५६८ शेतकऱ्यांकडून ४ हजार ४९४ क्विंटल २९ किलो तुरीची खरेदी झाली. 

तूर खरेदी केलेल्या ५६८ पैकी २४९ शेतकऱ्यांना १ कोटी १८ लाख ८७ हजार १०० रुपये वाटप करण्यात आले. तुरीसाठी हमी दराने खरेदी करण्याकरता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उस्मानाबाद केंद्रावरील ५८०, ढोकी २२९, कळंब ५८८, भूम ११०२, तुळजापूर ११७, लोहारा २७०, कानेगाव ३२८, गुंजोती १८२०, दस्तपूर ८५, नळदुर्ग २५, तर वाशी पारगावातील १५२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, खरेदी केलेल्या तुरीमध्ये उस्मानाबाद केंद्रावरील २५२ क्विंटल ५० किलो, कानेगाव केंद्रावरील ४९३ क्विंटल २९ किलो, गुंजोती केंद्रावरील १०१७ क्विंटल तुरीचा समावेश आहे.  हरभरा नोंदणीला प्रतिसाद 

जिल्ह्यातील ११ केंद्रांवर हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी जवळपास १२०८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद केंद्रावरील ४३००, ढोकी २६४६, कळंब २२७९, तुळजापूर ४५, लोहारा १२५५, कानेगाव ७००, गुंजोती ५५०, दस्तपूर ९५, नळदुर्ग २६, तर वाशी पारगाव केंद्रावरील १८५ शेतकरी आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत हरभऱ्याची शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. या मुदतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com