Purchase of two and a half thousand quintals of maize in Sangli
Purchase of two and a half thousand quintals of maize in Sangli

सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदी

जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून २ हजार ४७७ क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. १२८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१ लाख ९४ हजार ९६० रुपये वर्ग केली आहे. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून २ हजार ४७७ क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. १२८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१ लाख ९४ हजार ९६० रुपये वर्ग केली आहे. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. यंदा ३० हजार हेक्टरहून अधिक मक्याची पेरणी झाली आहे. मक्याचे कशासनाने हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री होऊ नये आणि किमान आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.

सध्या जिल्ह्यात मक्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी आटपाडी, जत, तासगाव आणि विटा या ठिकाणी चार केंद्रे सुरू केली आहेत. मका खरेदीची मर्यादा हेक्टरी २५९१ किलो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मक्याला १ हजार ७६० रुपये क्विंटल असा हमीभाव असल्याने १२८ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर मका विक्रीसाठी नोंदणी केली होती.

आटपाडी, जत आणि तासगाव याठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केल्याने ही केंद्र सुरू झाली. परंतू विट्यात मका विक्रीसाठी नोंदणीच झाली नसल्याने या केंद्रावर मक्याची खरेदी झाली नाही. मक्याची खरेदी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमही वर्ग केली आहे. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

खरेदी केंद्रनिहाय मक्याची खरेदी
खरेदी केंद्र शेतकरी संख्या खरेदी(क्विंटलमध्ये) रक्कम
आटपाडी ७१ १२३० २१ लाख ६४ हजार ८००
जत २२ ७२५ १२ लाख ७० हजार
तासगाव  ३५ ५२२ ९ लाख १८ हजार ७२०
एकूण १२८ २४७७ ४३ लाख ५९ हजार ५२०

हमीभावाने मक्याची खरेदी पूर्ण झाली आहे. ४१ लाख ९४ हजार ९६० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरित १ लाख ६४ हजार ५६० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा केली जाईल.   - दिलीप पाटील, जिल्हा पणन अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com