Agriculture news in Marathi Purchase two lakh quintals of cotton in the state | Agrowon

राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्री करीत आहेत. त्यामुळे खरेदी सुरु होऊन अवघा आठवडाभराचा कालावधी लोटला असतानाच ‘पणन’ व ‘सीसीआय’च्या माध्यमातून तब्बल २ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यापुढील काळात या दोन्ही यंत्रणांकडेच मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिल असे संकेत आहेत.

अमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्री करीत आहेत. त्यामुळे खरेदी सुरु होऊन अवघा आठवडाभराचा कालावधी लोटला असतानाच ‘पणन’ व ‘सीसीआय’च्या माध्यमातून तब्बल २ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यापुढील काळात या दोन्ही यंत्रणांकडेच मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिल असे संकेत आहेत.

जागतिकस्तरावर कापसाच्या सरकी दरात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम देशाअंतर्गत कापसाच्या व्यवहारावरदेखील दिसून येत आहे. गेल्या वर्षी सरकीला ३५०० रुपये क्‍विंटल दर होता. या वर्षी सरकीचे दर २२०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. रुई आणि सरकीच्या दरावर कापसाचे दर ठरतात. परिणामी, सरकी दरातील घसरणीचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मागणी नसल्यचे सांगत व्यापारी कापसाला ५१०० रुपयांचा दर देत आहे. ओलावा अधिक असला तरी जिनिंग व्यवसायावर परिणाम होईल त्यामुळे नाइलाजाने इतका दर द्यावा लागत असल्याचे देखील व्यापारी सांगतात. व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीस सुरुवात केली. आजपर्यंत सुमारे २२ केंद्रे राज्यात सुरू झाली असून केंद्रांची संख्या ५० पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. 

दरम्यान, केंद्रे सुरू होऊन केवळ आठवडाभराचा कालावधी झाला असतानाच पणन महासंघाकडील कापूस खरेदी ५० हजार क्‍विंटलवर पोचली आहे. सीसीआयने १ लाख ६० हजार क्‍विंटल कापसाची खरेदी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पणन महासंघाने पहिल्या टप्प्यात २२ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रांची संख्या मागणीनुसार ५० पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. ८ ते १२ टक्‍के ओलावा असलेला कापूसच येथे खरेदी केला जातो.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ


इतर अॅग्रो विशेष
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...