Agriculture news in marathi Purchase by WhatsApp Group from Pandharpur Market Committee | Agrowon

पंढरपूर बाजार समितीकडून ‘व्हॅाटसअॅप ग्रुप’द्वारे खरेदी-विक्री

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

सोलापूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदाराचे उपाय म्हणून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीनेही भाजीपाला व फळे बाजारातील लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा व्हॅाटसअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पालेभाजी खरेदी-विक्री करावी, असे आवाहन सभापती दिलीप घाडगे यांनी केले. 

सोलापूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदाराचे उपाय म्हणून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीनेही भाजीपाला व फळे बाजारातील लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा व्हॅाटसअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पालेभाजी खरेदी-विक्री करावी, असे आवाहन सभापती दिलीप घाडगे यांनी केले. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये नुकतीच आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सभापती घाडगे यांच्यासह उपसभापती विवेक कचरे यांच्यासह संचालक उपस्थित होते. त्यावेळी चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीने यापूर्वीच बेदाणा, डाळिंब आणि केळीचे सौदे बंद केले आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवा कायद्यातंर्गंत भाजीपाल्याचे लिलाव चालू ठेवले होते. पण, सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने समितीने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या दृष्टीने लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, या बंदच्या काळात बाजार समितीने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. खास शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी व्हॅाटसअॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील, असे ठरवले असल्याचे घाडगे म्हणाले. 

शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे छायाचित्र आणि किंमत टाकल्यानंतर व्यापारी संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्याची खरेदी करतील. शिवाय नगरपालिकेकडून पास देऊन व्यापारी आणि शेतकऱ्यांना शहरात फिरुन,किंवा काही ठराविक ठिकाणी बसून विक्री करता येईल, अशीही सोय आहे, असेही घाडगे म्हणाले. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...