agriculture news in marathi, purchasing centers in the blacklist,buldhana,maharashtra | Page 2 ||| Agrowon

हमीभावाने खरेदीत अनियमितता झालेल्या बुलडाण्यातील संस्था काळ्या यादीत
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

खरेदी केंद्रांची नावे अंतिम झालेली अाहे. जिल्ह्यात १३ केंद्र मंजूर झाले अाहेत. गेल्या वेळी काम समाधानकारक नसल्याने बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर, शेगाव, संग्रामपूर येथील संस्था काळया यादीत टाकल्या अाहेत. खरेदीच्या दृष्टीने शेगाव, संग्रामपूर येथे दुसऱ्या संस्थांकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव मिळालेला नाही.
- पी. एस. शिंगणे, जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा.

बुलडाणा  ः गेल्या हंगामात मूग, उडीद, सोयाबीन, तूर खरेदीमध्ये अनियमितता समोर अालेल्या केंद्रचालक संस्थांना या वेळी डच्चू दिला जात अाहे.  या खरेदीदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात अाल्याने त्यांचा या वेळी खरेदी प्रक्रियेतील सहभाग संपुष्टात अाला अाहे. बुलडाणा जिल्ह्यात पाच ठिकाणी असा गोंधळ झाला असून तेथे पर्यायी संस्थांच्या माध्यमातून यंदा हमीभाव खरेदी केंद्र चालविले जाणार अाहे. मात्र शेगाव व संग्रामपूर या दोन ठिकाणी पर्यायी संस्थांचे अर्जच नसल्याने केंद्र सुरू करण्याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली अाहे.  

बाजारात शेतीमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासन हमीभावाने खरेदी करीत असते. बहुतांश ठिकाणी तालुकास्तरावर खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून हे काम आतापर्यंत करण्यात अाले. मात्र अनेक ठिकाणी गोंधळ होऊन शासनाची बदनामी झाली. त्यामुळेच या वेळी केंद्र देताना अनेक निकष लावण्यात अाले अाहेत. मागील हंगामात ज्या केंद्राच्या ठिकाणी खरेदीत अनियमितता, माहिती वेळेत सादर न करणे तसेच इतर कारणांनी खरेदी केंद्र चर्चेत आले अशा संस्थांना प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याचे धाडसी पाऊल उचलेले अाहे.

त्यामुळे यावर्षीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, संग्रामपूर अाणि शेगाव येथे गेल्या हंगामात खरेदी प्रक्रियेत असलेल्या संस्था वगळून पर्यायी संस्थांच्या माध्यमातून केंद्र सुरू करण्याची तयारी आहे. मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा या ठिकाणी पर्याय उपलब्ध झाला. मात्र शेगाव, संग्रामपूर या ठिकाणी खरेदीसाठी कोणत्याही संस्थेचा प्रस्ताव अद्यापपर्यंत न मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यात अडचणी तयार झाल्या अाहेत. शासनाने मूग, उडीद खरेदीसाठी १५ अाॅक्टोबरपर्यंत अाॅनलाइन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना अावाहन केलेले अाहे. शिवाय खरेदीसाठी नव्या निकषांनुसार केंद्रांची नावे अंतिम करण्यात अाली अाहेत.

खरेदी केंद्रांमधून संग्रामपूर, शेगांवसह पाच तालुके वगळून शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे. हा दुजाभाव दूर करून संग्रामपूर आणि शेगांव येथील खरेदी केंद्रांना शासनाने मान्यता द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करू. शेगांव, संग्रामपूर परिसरात सोयाबीन, मूग व उडिदाचा पेरा मोठ्या प्रमाणात झालेला असून शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे, असे जळगाव जामोद बाजारसमितीचे सभापती  प्रसेनजित पाटील यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटकाजम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...