Agriculture news in Marathi Purchasing confusion in the dairy industry persists | Page 2 ||| Agrowon

डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायम

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 डिसेंबर 2021

स्पर्धेच्या गोंधळात नफा निश्‍चित न केल्यास दूध खरेदीदरांमधील चढ-उतार यापुढेही चालू राहतील, असा इशारा राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी दिला आहे

पुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक नफ्याचा (सेलिंग मार्जिन) मुद्दा शासनाने लटकत ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील दुधाचे खरेदीदर सतत अनियंत्रित असतात. स्पर्धेच्या गोंधळात नफा निश्‍चित न केल्यास दूध खरेदीदरांमधील चढ-उतार यापुढेही चालू राहतील, असा इशारा राज्य शासनाच्या दुग्धविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी दिला आहे. 

राज्यात सध्या खासगी प्रकल्पांकडून गाय दुधाला प्रतिलिटर २६ रुपये दर दिला जात आहे. मात्र सहकारी दूध प्रकल्पांचा दर शासनाने आधी घोषित केल्यानुसार २५ रुपये आहे. दुधाचे दर यापुढेही वाढते राहतील, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुधाला किमान ३० रुपये दर सध्या द्यायला हवा होता. मात्र खासगी व सहकारी अशा दोन्ही दूध प्रकल्पांकडून अडवणूक केली जात आहे. याबाबत श्री. कुतवळ यांनी काही अभ्यासपूर्ण मते मांडली. ‘‘दुधाच्या खरेदी व विक्रीबाबत शेतकऱ्यांना पूरक ठरणारे निर्णय घेण्यास भाग पाडायचे असल्यास सहकार व खासगी दूध क्षेत्राला एकाच नियमावलीत आणावे लागेल. 

दुधाच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना एक भाव देण्याबाबत कायदा करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. सहकारी दूध संघांना यापूर्वी प्रतिलिटर २५ रुपये खरेदीभाव देण्याचे बंधन होते. मात्र खासगी दूध प्रकल्प २२ रुपयांपर्यंत कमी दर देत होते. त्यामुळे सहकार प्रकल्पांना भरपूर दूध मिळत होते. आता खासगी प्रकल्पांनी भाव प्रतिलिटर २६ केलेला असल्याने सहकारी प्रकल्पांचा पुरवठा घटलेला आहे, असे कुतवळ यांनी निदर्शनास आणून दिले.’’ 

खासगी व सहकारी दूध प्रकल्पांमध्ये एकवाक्यता नाही. याचे कारण दोघांना सूत्रबद्ध करणारी नियमावली नाही. खासगी प्रकल्पांचे असे आहे, की दूध भुकटीचे बाजार वाढताच या प्रकल्पांना जादा दूध खरेदी हवी असते. मात्र भुकटी व लोण्याचे भाव कोसळताच खासगी खरेदी घटते. दुसरी बाब अशी, समजा प्रतिलिटर १५ रुपये नफा एखाद्या खासगी प्रकल्पाला हवा असल्यास नफ्याची रक्कम कायम ठेवून शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून किंवा कमी केले जातात. त्यामुळे दरामध्ये अनियमितता कायम राहणार आहे. ही अनिश्‍चितता दूर करण्यासाठी सहकाराप्रमाणेच खासगी प्रकल्पांनाही दर बांधून देण्याची भूमिका घ्यावी लागेल. बांधून दिलेल्या दराच्या खाली जाऊन दूध खरेदी करता येणार नाही, असे बंधन खासगी प्रकल्पांवर टाकणारा कायदा सरकारकडून करावा लागेल, अशी सूचना कुतवळ यांनी केली आहे.

श्रम, वाण नव्हे; तर खरेदीदर ठरतो महत्त्वाचा 
शेतकऱ्यांना दुधाचा खरेदीदर जास्त दिला तरच दुधाळ जनावरांना खर्चिक व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र दर कमी मिळत असल्यास या खर्चाला कात्री लावण्याचे धोरण दूध उत्पादक ठेवतात. तसे करणे अपरिहार्य आहे. म्हणजेच कितीही जातिवंत गाय असली, तरी दुधाला भाव मिळत नसल्यास या गाईची उपयुक्तता घटते. कारण भाव नसल्यास दूध कमी करण्याकडे उत्पादकाचा कल असतो. याचाच अर्थ शेतकऱ्यांचे श्रम किंवा दुधाळ जनावराचे वाण यापेक्षाही आता दुधाचा खरेदीदर हाच दुधाचे उत्पादन वाढविणारा किंवा घटविणारा प्रमुख मुद्दा बनला आहे, असे श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले.


इतर अॅग्रो विशेष
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....