Agriculture news in marathi Pure water in Karmala ; The most contaminated water in Pandharpur | Agrowon

करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत दूषित पाणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५ नमुने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील साथरोग नियंत्रण कक्षाच्या वतीने जानेवारीमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी ४२ नमुने दूषित असल्याचे या पाहणीतून समोर आले. 

सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५ नमुने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील साथरोग नियंत्रण कक्षाच्या वतीने जानेवारीमध्ये तपासण्यात आले. त्यापैकी ४२ नमुने दूषित असल्याचे या पाहणीतून समोर आले. 

जिल्हा परिषदेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील ६१५ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील ६४, दक्षिण सोलापुरातील ५४, मोहोळमधील  ११३, मंगळवेढ्यातील १८, सांगोल्यातील २२, माढ्यातील ३२, अक्कलकोटमधील  ७८, बार्शीतील ३६, करमाळ्यातील सहा, माळशिरसमधील १०४ आणि पंढरपुरातील ८८ असे एकूण ६१५ पाणी नमुने तपासण्यात आले. या नमुन्यांपैकी ४२ नमुने दूषित आढळले. पुढील कार्यवाहीसाठी याबाबतचा अहवाल देण्यात आला.

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाच, दक्षिण सोलापुरातील तीन, मोहोळमधील  चार, मंगळवेढ्यातील दोन, सांगोल्यातील एक, माढ्यातील  तीन, अक्कलकोटमधील  दोन, बार्शीतील  तीन, माळशिरसमधील  सात,  पंढरपुरातील १२ पाणी नमुने दूषित आहेत. करमाळ्यातील  एकही नमुना दूषित नसल्याचे; तर पंढरपूर तालुक्‍यातील सर्वाधिक १२ नमुने दूषित असल्याचे या पाहणीतून समोर आले. 

वर्षभरात दोन वेळा तपासणी

पावसाळ्यात जलस्त्रोतांना नवीन पाणी येते. या कालावधीतील पाणी नमुने आणि उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने या कालावधीतील पाणी नमुने तपासले जातात. वर्षभरातून दोन वेळा ही तपासणी होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जाते.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...