पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५ रुपयांचा दर

रामनगरम येथील मार्केट खालोखाल दर मिळत आहे. त्यामुळे पूर्णा येथील मार्केटमध्ये या भागातून रेशीम कोषाची चांगली आवक होत आहे. - डॉ. संजय लोलगे,अध्यक्ष रेशीम कोष मार्केट, पूर्णा
At Purna, the rate of silk cell is 515 rupees per kilogram
At Purna, the rate of silk cell is 515 rupees per kilogram

परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष मार्केटमध्ये सोमवारी (ता. २७) दर्जेदार रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५ रुपये दर मिळाला. या मार्केटमधील हा आजवरचा उच्चांकी दर आहे, असे येथील सूत्रांनी सांगितले.

हवामान बदलामुळे पारंपरिक पध्दतीतून उत्पन्नाची शाश्वती नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा विस्तार झाला आहे. परंतु, या भागात रेशीम कोष मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्नाटकातील बंगरळूर जवळील रामनगरम येथील रेशीम कोष मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी न्यावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि खर्च लागत असे.

सोमवारी (ता.२७) चुडावा येथील शेतकरी वैजनाथ देसाई यांच्या ७६.१३ किलो रेशीम कोषास प्रतिकिलो ५१५ रुपयांचा दर मिळाला. एकूण आवक झालेल्या कोषास सरासरी प्रतिकिलोस ४५६ रुपये दर मिळाला. सोमवारी (ता. २७) रामनगरम येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस किमान २०५ ते ५५७ रुपये दर मिळाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com