Agriculture news in Marathi Purnathadi buffalo was offered royal recognition | Agrowon

पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव पडून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, तिची स्वतंत्र ओळख असावी या उद्देशाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन विभागाकडे दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही. 

अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, तिची स्वतंत्र ओळख असावी या उद्देशाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन विभागाकडे दीड वर्षांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही. 

केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या या विभागाने लक्ष घातल्यास अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत आढळणारी ही पूर्णाथडी म्हैस एक स्वतंत्र स्थान निर्माण करू शकेल.

संकरित म्हशींचे चलन वाढल्यापासून पारंपरिक जाती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. पारंपरिक जातींमध्ये ही पूर्णाथडी म्हैस ओळखली जाते. पूर्णाथडी म्हैस विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या नागपुरी म्हशी म्हणूनच आज ओळखली जाते. मात्र नागपुरी म्हशींपेक्षा रंगाने फिकट राखाडी रंगाच्या म्हशी पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पूर्णा नदीकाठी असलेल्या भागात विशेषत्वाने आढळतात. स्थानिक पातळीवर यांना भुरी, राखी, गावळी या नावांनीही संबोधले जाते. मध्यम आकारमान, दुधातील स्निग्धाच उच्च प्रमाण, उत्तम प्रजनन क्षमता, कमी व्यवस्थापन खर्च आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता या गुणधर्मामुळे लघू आणि मध्यम म्हैसपालकांमध्ये पूर्णाथडी म्हैस विशेष लोकप्रिय आहे.

या म्हशींना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेतील पशू अनुवांशिकी व पैदास शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी सन २०१६ पासून याबाबत काम सुरू केले. सहकाऱ्यांसह त्यांनी पूर्णा खोऱ्यातील हा पैदासक्षेत्राचा भाग पालथा घालत या म्हशीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ‘माफसू’कडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पशुधन विभागामार्फत राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन विभागाकडे (कर्नाल) पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची गरज आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या म्हशीच्या जातीबाबत डॉ. साजिद अली यांनी शोधप्रबंधही लिहिला आहे. या म्हशीला ओळख मिळाल्यास म्हशीची किमत वाढेल. प्रचार-प्रसार होईल. तसेच योजनांमध्येही या जातीच्या म्हशीचा समावेश होईल. पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.

पूर्णाथडी म्हशीचे वैशिष्ट्ये 
पूर्णाथडी म्हैस दिवसाला साधारणत ः ४ ते ५ लिटर दूध देते आणि एका वेतात (सरासरी २५० दिवस) १००० किलोग्राम दूध देते. दोन वेतातील अंतर सरासरी ४५० दिवस असून पहिल्यांदा विण्याचे वय हे साधारण ५ वर्षे एवढे आढळते. पूर्णाथडीच्या दुधात स्निग्धाच प्रमाण सरासरी ८.५ टक्के असल्याने स्थानिक म्हैसपालकांनी पूर्णाथडी म्हशीची निवड करण्यास नेहमीच झुकते माप दिले आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
पूर्णाथडीला राजमान्यता मिळण्याच्या दृष्टीने केंद्रात या भागाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या बाबींसाठी हा प्रस्ताव पुढे जाऊ शकलेला नाही. राज्यशासन, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर एका जातीच्या म्हशीला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
 


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनपुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता....
कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले...अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...