नांदेड, परभणी, हिंगोलीत हजार कोटीवर पीक कर्जवाटप उद्दिष्ट

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बीत हजार कोटीवर पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बीत हजार कोटीवर पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट

नांदेड : या रब्बी हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील बॅंकांना एकूण १ हजार ७९ कोटी ८३ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

रब्बी हंगामातील पीक कर्जवाटपाची सुरवात १ ऑक्टोबरपासून होते. यंदा नांदेड जिल्ह्यातील बॅंकांना ४९१ कोटी ८८ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांना ३४० कोटी २ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३७ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ६९ कोटी २९ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला ४४ कोटी ६५ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना १७३ कोटी १३ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३३ कोटी ९८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला ७४ कोटी ५४ लाख रुपये, असे एकूण ३११ कोटी ४७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे.

हिंगोलीतील बॅंकांना २७४ कोटी ४८ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांना १९७ कोटी ४८ लाख ३८ हजार, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ४० कोटी, जिल्हा बॅंकेला ३७ कोटी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.  

नांदेड जिल्हा बॅंक वगळता अन्य बॅंकांना यंदाही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पीककर्जाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सर्व बॅंकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

जिल्हानिहाय रब्बी पीक कर्जवाटप उद्दिष्ट (कोटी रुपये) 

जिल्हा कर्जवाटप उद्दिष्ट
नांदेड ४९१.८८
परभणी ३१३.४७
हिंगोली  २७४.४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com