नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
सांगलीत भाजपला धक्का; महाविकास आघाडीला कौल
ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे.
सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे. तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील यांना धक्का बसला असून, राष्ट्रवादीने १७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील १५२ गावांची निवडणूक झाली. पैकी नऊ गावे बिनविरोध झाली. १४३ गावांसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान झाले. सोमवारी (ता. १८) सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने यासाठी मतदान झाले होते. त्यातच राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीमुळे चित्र काय आणि कसे राहील, याची उत्सुकता होती. त्यानुसार जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कडेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे देशमुख यांच्या गटात निवडणूक झाली. मात्र, कडेगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व तर भाजपचा धुव्वा उडाला आहे. शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक गटाने ६-१ने बाजी मारून माजी आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख गटाला धक्का दिला आहे.
बिळाशी येथे दोन भाऊंनी (आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख) एकत्रित येऊन ११-०ने शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला धूळ चारली आहे. पलूस तालुक्यात झालेल्या १२ ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीत कॉँग्रेसने बाजी मारली. तर ३ ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपला एकही जागा मिळाली नाही. भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.
आटपाडी तालुक्यात शिवसेनेकडे सहा ग्रामपंचायत गेल्या असून, भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे. खानापूर तालुक्यात १३ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायतींवर शिवनेसेचे आमदार अनिल बाबर गटाची सत्ता आली. माजी आमदार सदाशिव पाटील गटाकडे तीन आणि रामराव पाटील गटाकडे एक ग्रामपंचायत आली.
तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गटामध्ये चुरशीची लढत झाली. १७ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे तर १२ ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या आहेत. जत तालुक्यात आमदार विक्रम सावंत यांच्या गटाकडे ११ ग्रामपंचायती, तर भाजप समर्थकांनी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. मिरज तालुक्यातील तुंगमध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादी विकास आघाडीने १५ पैकी १३ जागा जिंकून सत्ता मिळवली.
- 1 of 1057
- ››