Agriculture news in marathi Push BJP in Sangli; Kaul to Mahavikas Aghadi | Page 2 ||| Agrowon

सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला कौल 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे. 

सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे. तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील यांना धक्का बसला असून, राष्ट्रवादीने १७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

सांगली जिल्ह्यातील १५२ गावांची निवडणूक झाली. पैकी नऊ गावे बिनविरोध झाली. १४३ गावांसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान झाले. सोमवारी (ता. १८) सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने यासाठी मतदान झाले होते. त्यातच राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीमुळे चित्र काय आणि कसे राहील, याची उत्सुकता होती. त्यानुसार जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

कडेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे देशमुख यांच्या गटात निवडणूक झाली. मात्र, कडेगाव तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व तर भाजपचा धुव्वा उडाला आहे. शिराळा तालुक्‍यातील जांभळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक गटाने ६-१ने बाजी मारून माजी आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख गटाला धक्का दिला आहे.

बिळाशी येथे दोन भाऊंनी (आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख) एकत्रित येऊन ११-०ने शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला धूळ चारली आहे. पलूस तालुक्‍यात झालेल्या १२ ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीत कॉँग्रेसने बाजी मारली. तर ३ ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपला एकही जागा मिळाली नाही. भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.

आटपाडी तालुक्यात शिवसेनेकडे सहा ग्रामपंचायत गेल्या असून, भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे. खानापूर तालुक्यात १३ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायतींवर शिवनेसेचे आमदार अनिल बाबर गटाची सत्ता आली. माजी आमदार सदाशिव पाटील गटाकडे तीन आणि रामराव पाटील गटाकडे एक ग्रामपंचायत आली. 

तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या गटामध्ये चुरशीची लढत झाली. १७ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे तर १२ ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या आहेत. जत तालुक्यात आमदार विक्रम सावंत यांच्या गटाकडे ११ ग्रामपंचायती, तर भाजप समर्थकांनी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. मिरज तालुक्यातील तुंगमध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादी विकास आघाडीने १५ पैकी १३ जागा जिंकून सत्ता मिळवली. 


इतर ताज्या घडामोडी
अवैध बोअरवेलप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईअमरावती ः ड्रायझोन जाहीर करण्यात आल्याने मोर्शी,...
खानदेशात कांद्याच्या दरातील घसरण सुरूचजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या...
काजू बी १५० रुपये हमीभावाने खरेदी करावीरत्नागिरी ः काजू बी ला महाराष्ट्र सरकारने १५०...
जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा काढणीस वेगतांदलवाडी, जि. जळगाव :  सध्या गहू व हरभरा...
‘गोकुळ’बाबत मुंबईत खलबतेकोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)...
जवस पिकाकडे वळा : डॉ. झाडे औरंगाबाद : ‘‘एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-...
वाशीममध्ये कोरोना रोखण्यासाठी सरपंच...वाशीम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा...
‘विष्णुपुरी’च्या पाण्याबाबत कार्यवाही...नांदेड : ‘‘विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ...
कलंबरमध्ये महिला शेतीशाळेस प्रतिसादनांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी...
‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा...नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित...
चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये अंजन, निवडुंगदीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची अंजन या चारा...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या...
केसर आंबा व्यवस्थापनया वर्षी आंबा झाडांना मोहोर आला. सध्या...
फ्लॉवर ‌जांभळा-गुलाबी‌ होण्याची समस्याआनुवांशिकदृष्ट्या‌,‌ फ्लॉवर ‌पांढऱ्या,‌ ‌जांभळ्या...
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...