Agriculture News in Marathi Put a solar fence on the farm | Agrowon

शेतीला सोलर कुंपण घाला 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे, त्या भागात सोलर फेन्सिग लावण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. 

यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे, त्या भागात सोलर फेन्सिग लावण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. 

मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी आंतर विभागीय जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे सभा घेण्यात आली. 
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वन विभागाचे अधिकारी केशव वाबळे, किरण जगताप, निरंजन दिवाकर, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन बनसोड, विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंता मनीषा बुरांडे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वाघाचा वावर असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून वाघाच्या वावर कोणत्या भागात कोणत्या वेळी जास्त असतो याची माहिती प्राप्त होईल व त्या भागात वाघाचे नागरिकांवरील हल्ल्याला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करता येईल. वन्यप्राण्यांना अटकाव करण्यासाठी अनेक ठिकाणी तारेत विद्युत प्रवाह (करंट) सोडण्यात येतो. त्यामुळे अनेकदा वन्यजीव, पाळीव प्राणी व जनसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा प्रकारे तारेत विद्युत प्रवाह सोडून नागरिक व वन्यजीव यांना धोका निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध वीजचोरी व जीवितहानीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे नोंदवावेत.’’ 

विविध वनवृत्तामध्ये वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्याजवळ बोअरवेल व सोलरचे काम केल्यास टँकरद्वारे पाणी सोडण्याची गरज राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वन्यजीवाद्वारे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र नुकसान होऊ नये, यासाठी वाघाचा वावर असलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक बचाव पथक व रॅपिड रिस्पॉन्स टीम गठित करून ॲक्टिव्ह करावी. रॅपिड रिस्पॉन्स टीम व प्राथमिक बचाव पथकाद्वारे माहिती देऊन जनजागृती करावी. वाघाची हालचाल आणि कालावधी समजून घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावावेत. त्यासाठी स्थळांचा शोध घ्यावा आणि मोबाइलचलित कॅमेराचा वापर करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.  
 


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...