महाबीजच्या ‘गुणवत्ता नियंत्रण’ला  राज्य बियाणे प्रयोगशाळेचा दर्जा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः शिवणी येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेस शासनाने राज्य बियाणे प्रयोगशाळा घोषित केले आहे. २१ आॅगस्टला प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार ही मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता अकोल्यातच बियाण्यांची चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे महाबीजच्याही शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महामंडळाची गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा ही राज्य बियाणे प्रयोगशाळा घोषित झाल्याने कोणत्याही अधिसूचित वाणाच्या तसेच इतर बियाण्यांचे विश्लेषण या प्रयोगशाळेत करता येईल. महामंडळाच्या प्रयोगशाळेस यापूर्वी आंतरराष्ट्रीय बीज परीक्षण असोशिएशन्स (आयएसटीए) या संस्थेचे २०१८ पासून सभासदत्व मिळालेले असून, अधिस्वीकृतीची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. 

या प्रयोगशाळेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना उच्चतम दर्जाचे, गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्यासही मदत होईल, असा विश्वास महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांनी व्यक्त केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com