नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप

नगरः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत २२ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरु आहे. आतापर्यंत १ कोटी २३ लाख २० हजार टन उसाचे गाळप झाले आहे.
A quarter of a crore tonnes of sugarcane is crushed in Nagar district
A quarter of a crore tonnes of sugarcane is crushed in Nagar district

नगरः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत २२ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरु आहे. आतापर्यंत १ कोटी २३ लाख २० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. १ कोटी १८ लाख क्विटंल साखर उत्पादित झाली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने एक कारखाना बंद झाला आहे. 

जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. यंदा २२ साखर कारखाने सुरु आहेत. ६० हजार ५०० टन दैनिक गाळप क्षमता आहे. दररोज साधारण ६० ते ६१ टन उसाचे गाळप होत आहे. 

साखर सहसंचालक कार्यालयाच्या अंदाजानुसार, यंदा साधारण एक कोटी २० लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज होता. मात्र आतापर्यंतच एकूण १ कोटी २३ लाख २० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १ कोटी १८ लाख ४३ हजार ३१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

‘अंबालिका’ आघाडीवर 

कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने आतापर्यंत एक कारखाना बंद झाला आहे. या महिनाअखेर अजून दोन कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. मात्र राहाता, राहुरी, संगमनेर, अकोले, नेवासा, शेवगावमधील तालुक्यातील कारखाने अजून दीड ते दोन महिने सुरु राहण्याचा अंदाज आहे. यंदा साखरेचा सरासरी ९.६१ टक्के उतारा असल्याचे सांगण्यात आले. गाळपात राशीनचा अंबालिका कारखाना आघाडीवर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com