मराठवाड्यात सव्वा महिन्यात ३५० वर जनावरांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १९ जुलै दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३९५ लहान, मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. २३ व्यक्‍तींचाही मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे अनेक भागात जमिनी खरडून गेल्या.
 In the quarter of a month in Marathwada Death of over 350 animals
In the quarter of a month in Marathwada Death of over 350 animals

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १९ जुलै दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३९५ लहान, मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. २३ व्यक्‍तींचाही मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे अनेक भागात जमिनी खरडून गेल्या. जमिनीची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम जिल्हास्तरावर सुरू आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात गत आठवडाभरात पावसाचा जोर वाढला. अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. १ जून ते १९ जुलै दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ३९५ लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ११९ मोठ्या, तर २७६ लहान जनावरांचा समावेश आहे. या शिवाय ओढकाम करणाऱ्या ७३ मोठ्या व १७ लहान जनावरांचाही मृत्यू झाला.

नैसर्गिक आपत्तीने अनेकांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड कामे करावी लागणार आहेत. प्रशासनस्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आधार देण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यातील ४२ कुटुंबावर तात्पुरते स्थलांतरित होण्याची वेळ आली. यामध्ये जवळपास २५३ व्यक्‍तींचा समावेश होता. 

२८६ घरांची पडझड

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील २८६ घरांची, गोठ्यांची पूर्णतः:, अंशतः: पडझड झाली. यामध्ये ८ कच्च्या, पक्‍क्‍या घरांची पूर्णतः:, २१ पक्‍क्‍या घरांची अंशतः: , १२६ कच्च्या घरांची अंशतः: तर ७ गोठ्यांचा नुकसानीत समावेश आहे.

२२ व्यक्‍तींचा मृत्यू

नैसर्गिक आपत्तीत २२ व्यक्‍तींचाही मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरात वाहून गेलेल्या १०, वीज पडून मृत्यू १० व इतर २ व्यक्‍तींचा समावेश आहे. पुरात वाहून मृत झालेल्या व्यक्‍तींमध्ये परभणीतील १, हिंगोलीतील ४, नांदेडमधील ३ व उस्मानाबादमधील दोन, तर वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्‍तींमध्ये औरंगाबादमधील २, नांदेडमधील ५ तर परभणी, हिंगोली व लातूरमधील प्रत्येकी एका व्यक्‍तीचा समावेश आहे.

अतिवृष्टीमुळे ५० टक्के जमिनीचे व त्यावरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजून कुणी आले नाही. प्रशासनाने पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी. - सोनाजी लोंढे, शेवगळ, जि. जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com