Agriculture News in Marathi The question of crop insurance is still unresolved | Agrowon

बुलडाणा : पीकविम्याचा प्रश्‍न अधांतरीच 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघात असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव या तीन तालुक्यांतील पीकविम्याचा प्रश्‍न अधांतरीच आहे.

बुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघात असलेल्या संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव या तीन तालुक्यांतील पीकविम्याचा प्रश्‍न अधांतरीच आहे.

विमा कंपनी शासन हिश्‍शाची प्रतीक्षा करीत थांबलेली आहे. तर शासन कंपनीवर जबाबदारी देऊन मोकळे होत असल्याचे एकूणच चित्र बघायला मिळत आहे. १ सप्टेंबरला कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत विमा कंपनीला बुधवारी (ता.१५) पर्यंत विम्याची रक्‍कम जमा करण्याची मुदत लोकप्रतिनिधींनी दिली होती. या काळात पैसे जमा न झाल्याने आता या प्रकरणी इशारा देणारे जळगाव जामोदचे आमदार, माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

जिल्ह्यातील पीकविम्याच्या प्रश्‍नावर मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दालनात १ सप्टेंबरला बैठक झाली होती. गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ते विमा भरपाईस पात्र ठरले होते. त्यांना विमा मंजूरही झालेला आहे. कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पीकविमा देण्यात यावा, असा आग्रह डॉ. कुटे यांनी धरला होता. तसे न झाल्यास कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी तेव्हा दिला. गेले १५ दिवस पीकविम्यास पात्र असलेले शेतकरी प्रतीक्षा करीत थांबलेले आहेत.

मात्र या काळात पीकविमा भरपाईबाबत कुठलीही हालचाल झालेली नाही. हे लक्षात डॉ. कुटे काही शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी विमा कंपनी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत पाठपुरावा सुरू केला. या दरम्यान विमा कंपनीकडून शासनाच्या हिश्‍शाची बाब पुढे केली जात असल्याचे समोर आले. शासनाचा हिस्सा मिळताच शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ जमा करण्याबाबत कंपनीचे अधिकारी सांगत असल्याचे डॉ. कुटे म्हणाले. दुसरीकडे शासन हे विमा कंपनीवर जबाबदारी ढकलत आहे. 

...तर आंदोलन करणारच : डॉ. कुटे 
अल्टिमेटम देऊनही पीकविमा जमा झालेला नाही. त्यामुळे या प्रश्‍नाला तडीस नेण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही. गुरुवारी (ता.१६) विमा कंपनी व अधिकाऱ्यांसोबत एकदा पुन्हा चर्चा करू. ठोस काही होणार नसेल तर मी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन सुरू करणार आहे, असे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...