agriculture news in marathi The question of payment before the dairy industry in the co-operative sector | Agrowon

सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर देयकांचा प्रश्न

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

लॉकडाउनमुळे ग्राहकच नसल्याने विक्रीअभावी भांडवलाचा मोठा प्रश्न सहकारी दूध संघांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची देयके लांबणीवर जात आहेत. 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे नियमित संकलित होणाऱ्या दुधाची मागणी मंदावली आहे. त्यामुळे अतिरिक्त दूध संकलित होत गेले. परिणामी, विक्रीपश्चात उरणाऱ्या दुधावर संघ पातळीवर भुकटी व लोणी निर्मिती करण्याचा पर्यायी कार्यक्रम सुरू आहे. यात दुग्धजन्य पदार्थ विक्री बंद आहे. त्यामुळे संघांनी भांडवलही गुंतवले; मात्र लॉकडाउनमुळे ग्राहकच नसल्याने विक्रीअभावी भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची देयके लांबणीवर जात आहेत. 

राज्यात होणाऱ्या १ कोटी ३० लाख लिटर संकलित दुधापैकी ९० लाख अतिरिक्त दुधाचा साठा वाढल्याने संस्थांनी भुकटी व लोणी निर्मिती सुरू केली. त्याचे उत्पादन वाढतच जाऊन विक्रीअभावी गोदामात माल पडून आहे. त्यामुळे भांडवल गुंतवून त्याचा परतावा नाही. संघांनी घेतलेली जोखीम घेऊनही खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १२७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली.'महानंद'च्या माध्यमातून ४ कोटी लिटर दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेऊन २ कोटी १५ लिटरपेक्षा जास्त दुधाची भुकटी तयार झाली आहे. त्यापोटी सरकारने ५० कोटी रुपयांचे अनुदान महानंदकडे वर्ग केले आहे. 

ही योजना सुरू झाल्यानंतर दूध महानंदकडे पाठवले जात आहे. मात्र, खेळते भांडवल संपुष्टात आल्याने काही संघांकडून उत्पादकांना वेळेवर पैसे देता येईना. १० पेक्षा अधिक दिवसांनी दिली जाणारी देयके आता २० तर, काही ठिकाणी ३० दिवसानंतर अदा होत आहेत. ज्यावेळी संघांनी उत्पादकांचे पैसे दिल्यानंतर विभागीय व जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांकडून बँक तपशील, दुधाची गुणवत्ता यानुसार महानंद पैसे देणार आहे.

त्यामुळे आता दुधावर प्रक्रियेत भांडवल गुंतविले गेल्याने उत्पादकांचे पैसे द्यायला नाहीत, तर जोपर्यंत संघ पैसे देणार नाही, तोपर्यंत संघांनाही महानंद पैसे देणार नाही. अशा दुहेरी अडचणीत संघांना जावे लागत आहे. सरकारने आता खेळते भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्यातील दूध संघ करत आहेत. मात्र, संघाकडे पैसेच नसल्याने पैसे अदा करायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. 

सध्य दूध उद्योगाची स्थिती

राज्यात संकलित दूध १ कोटी ३० लाख 
पिशवीबंद विक्री ४० लाख लिटर
अतिरिक्त दूध ९० लाख लिटर

महानंदद्वारे भुकटी निर्मिती योजनेत सहभाग

शासकीय योजना १०
दूध संघ ३३
दैनंदिन दुधावरील प्रक्रिया ६ लाख लिटर

संघाच्या प्रमुख मागण्या

  • थेट दूध उत्पादकांनाच्या खात्यावर प्रतिलितर ५ रुपये अनुदान द्या 
  • दूध व प्रक्रियायुक्त पदार्थाच्या विक्रीसाठी केंद्रे सुरू करून परवानगी द्या 
  • अल्प मुदतीच्या कर्जाद्वारे कमी व्याज दराने खेळते भांडवल द्या. 
     

खासगी दूध उद्योगांवर कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र, सहकारी संस्थांवर निर्बंध आहेत. खासगी उद्योगांनी दुधाचे दर कमी केले. मात्र, सहकारी संस्थांना २५ रुपये लितरप्रमाणे देणे बंधनकारक आहे. त्यात दूध उत्पादकांना अगोदर पैसे दिल्यानंतर संघाना पैसे मिळतील. खेळते भांडवल संपल्याने पैसे द्यायचे कसे? कर्जाचा बोजा चढता आहे. सरकारने यात लक्ष द्यावे. 
- राजेश परजणे, अध्यक्ष, गोदावरी खोरे नामदेवराव परजने पाटील सहकारी दूध संघ, कोपरगाव 

राज्य सरकारने यात लक्ष घालून आर्थिक तरतूद करून दिलासा दिला. मात्र, दूध संघांची आर्थिक स्थिती बिकट आहे. लोणी व भुकटी निर्मितीत भांडवल गुंतले. त्यामुळे राज्यातील संघांना उत्पादकांना पैसे देता येईना. आता केंद्राने यात लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पॅकेज द्यावे. 
- रणजितप्रसाद देशमुख, अध्यक्ष, महानंद, मुंबई 
 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...