agriculture news in Marathi questionable process of inspections Maharashtra | Agrowon

पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद : बियाणे उद्योगातील सूत्र

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत कंपन्यांवर सरसकट कारवाई करण्यापूर्वी कृषी विभागाकडून वस्तुस्थिती विचारात घेतली जात नाही. तसेच, पंचनाम्याची प्रक्रिया देखील संशयास्पदपणे जलदरित्या पूर्ण केली जात आहे, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत कंपन्यांवर सरसकट कारवाई करण्यापूर्वी कृषी विभागाकडून वस्तुस्थिती विचारात घेतली जात नाही. तसेच, पंचनाम्याची प्रक्रिया देखील संशयास्पदपणे जलदरित्या पूर्ण केली जात आहे, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविल्याचा ठपका ठेवत कृषी विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यामुळे बियाणे कंपन्या चिंतेत आहेत. विशेष म्हणजे काही नामांकित कंपन्यांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. ‘‘बियाणे विक्री व्यवसायात चुकीचे घटक शिरले आहेत हे मान्य आहे. मात्र, अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देणाऱ्या कंपन्या स्वतःहून बदनामीकारक कृत्य करतील का? बियाणे न उगवण्यास जबाबदार ठरणाऱ्या इतर मुद्यांचा विचार का केला गेला नाही,’’ असे सवाल उपस्थित केले जात आहेत. 

बियाणे उगवणीमुळे तयार झालेल्या गोंधळाचा फायदा घेत काही ठिकाणी बियाणे कंपन्यांना धमकावले जात आहे. त्यातून आर्थिक फायदा करून घेण्याचा खटाटोप काही घटकांकडून होत असल्याचे बियाणे उद्योगाचे म्हणणे आहे. बियाणे व्यवस्थित हाताळणे, बीजप्रक्रिया, व्यवस्थित खोलीवर पेरणी, वाफसा, पाऊस कमी जास्त पडणे अशा विविध बाबी उगवणीला जबाबदार ठरतात. त्यामुळे कंपन्यांनी निकृष्ट बियाणे विकले असे सरसकट म्हणता येत नाही.

एका गावात असलेल्या दोन तक्रारी पुढे २०० पर्यंत नेल्या जात आहेत. दिवसभरात फक्त १०-१५ पंचनामे करणे शक्य असताना शेकडो पंचनामे झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे, असे कंपन्यांच्या गोटातून सांगण्यात आले. 

कृषी खात्याकडून पंचनामे करताना अनेक ठिकाणी कंपन्यांना कळवलेले नाही. तसेच पंचनामे देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. कंपन्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देणारी, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी 
ओढूनताणून फौजदारी गुन्हे दाखल होत असल्याने न्यायालयात पुरावे सादर करताना कृषी विभागाची अडचण होईल. तसेच, या मुद्यांवर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आमची आहे, असे बियाणे कंपनीच्या एका संचालकाने स्पष्ट केले. 

बियाणे कंपन्या म्हणतात... 

  • काही ठिकाणी बियाणे कंपन्यांना धमकावले जात आहे. त्यातून 
  • आर्थिक फायद्यासाठी काही घटकांकडून खटाटोप 
  • बियाणे व्यवस्थित हाताळणे, बीजप्रक्रिया, व्यवस्थित पेरणी, वाफसा, पाऊसही उगवणीला जबाबदार 
  • दिवसभरात शेकडो पंचनामे झाल्याचे दाखवले जात आहे 
  • कृषी खात्याकडून पंचनामे करताना अनेक ठिकाणी कंपन्यांना कळवलेले नाही 
  • पंचनामे चुकीच्या पद्धतीने सुरू 
  • कंपन्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात नाही 
     

इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...