agriculture news in marathi, The questionnaire of returning crop insurence | Agrowon

मराठवाड्यात पीकविमा परताव्याचा प्रश्‍न ऐरणीवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

औरंगाबाद : राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे रविवारी (ता. ७) पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कृषी विभागातर्फे राबविल्या गेलेल्या विविध योजना, त्यांचे फलित व सद्यःस्थिती याचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे रविवारी (ता. ७) पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कृषी विभागातर्फे राबविल्या गेलेल्या विविध योजना, त्यांचे फलित व सद्यःस्थिती याचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रविवारी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, विविध नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप, वीजटंचाई, पीक कर्जवाटप, खरीप हंगाम बियाणे, खते उपलब्धता, पीकविमा योजना, मनरेगा आदींचा आढावा बैठकीत घेण्यात येईल. पिके पावसाअभावी धोक्‍यात आहेत. पीकविमा परताव्याचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यावर काय आढावा घेतला जातो, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

डॉ. बोंडे साहेब जरा इकडे लक्ष द्या...

दुष्काळाने मराठवाड्यातील मोसंबी, डाळिंब, आंबा, आदी बहूवार्षिक फळपिकांच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. दुष्काळ निधीच्या माध्यमातून फळबागधारक शेतकऱ्यांना इतर पिकाप्रमाणे मदत मिळाली. खर्च फळबागधारकांना आर्थिकदृष्ट्या उद्‌ध्वस्त करणारा ठरला आहे. उद्‍ध्वस्त फळबागांचे क्षेत्र नेमके किती, हे न कळल्याने वयोमर्यादेनुसार उत्पादनक्षम फळबागा किती याविषयीचे आकलन होत नाही. ‘ॲग्रोवन''ने याविषयी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. २०१२ च्या दुष्काळात बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्‍टरी  मदतीचा हात दिला होता. तो आधार या वेळच्या  दुष्काळात शासनाने दिला नाही, ही बाब शेतकऱ्यांनीही शासन - प्रशासनाच्या  निदर्शनास आणून दिली आहे.

मराठवाड्यातील शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगावरही दुष्काळाचे मोठे संकट आहे. रेशीम उत्पादकांच्या महत्त्वाच्या मागण्यांविषयी शासनस्तरावरून निर्णय होणे आवश्‍यक आहे. पावसाअभावी पेरणी न झालेले व  काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडेही कृषिमंत्र्यांनी लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...