दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर रांगा
नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. उत्साही वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. १८) मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात अंतिम मतदान ८०.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
मुदत संपलेल्या एक हजार १५ ग्रामपंचायतींपैकी १०३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर, दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द झाली होती. यामुळे ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत १३ लाख २१ हजार १४७ मतदारांपैकी १० लाख ७८ हजार ११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पाच लाख १५ हजार ५३४ महिला, तर पाच लाख ६२ हजार ५८२ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
मतदानाची टक्केवारी ८१.६२ टक्के झाल्याची माहिती मिळाली. मतदानासाठी ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी जबाबदारी पार पाडली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांच्यासह उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांनी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
मतदानाची अंतिम टक्केवारी
नांदेड - ७८.५६, अर्धापूर - ८३.९०, भोकर - ८३.७५, मुदखेड - ८२.१४, हदगाव - ७९.६३, हिमायतनगर - ८२.९६, किनवट - ७९.४३, माहूर - ८१.३५, धर्माबाद - ८२.३८, उमरी - ८४.२४, बिलोली - ८२.१६, नायगाव - ८१.५३, देगलूर - ८०.७४, मुखेड - ८०.६५, कंधार - ८१.३७, लोहा - ८४.८६. एकूण - ८०.६० टक्के
- 1 of 1054
- ››