शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा
जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडले. बहुतांशी गावांमध्ये गटागटांत जोरदार ईर्षा असल्याने याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाला.
कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडले. बहुतांशी गावांमध्ये गटागटांत जोरदार ईर्षा असल्याने याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाला. अनेक गावांमध्ये सकाळी बारापर्यंत चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. सकाळपासूनच मतदानाच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे दृष्य होते. मतदारांनी मतदान करूनच शेतकामासाठी जाण्यास प्राधान्य दिले परिणामी सकाळपासून मतदान केंद्र गर्दीने फुलली होती.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३८६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. १ हजार ५५३ मतदान केंद्रावर मतदान झाले. प्रत्येक मतदार केंद्राबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. संवेदनशील गावामध्ये जादा पोलिस कुमक तैनात केली होती.
उमेदवारांचे विजय काठावरील मताधिक्याने होत असल्याने उमेदवारांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबवली होती. मतदानाच्या निमित्ताने गलीगल्लीतील चुरशीने उचांक गाठल्यामुळे काही गावात वादावादीचे प्रकार घडले. सकाळी साडेसातपासूनच मतदानासाठी लोकांनी गर्दी केली. शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने दिसून आले. विविध कार्यालयांत कामावर जाणाऱ्यांची धावपळ दिसत होती.
- 1 of 1055
- ››