नगरमध्ये उडदाला क्विंटलला सात हजार रुपयांपर्यंतचा दर

नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाला गेल्या आठवड्यात ५ हजार ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
To the quintal of the fly in the city Rate up to seven thousand rupees
To the quintal of the fly in the city Rate up to seven thousand rupees

नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाला गेल्या आठवड्यात ५ हजार ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दर दिवसाला मुगाची साधारण ५० ते ६० क्विंटलची आवक झाली. भाजीपाल्याच्या आवकेत आणि दरात मात्र सतत चढउतार सुरु होता. 

नगर येथील बाजार समितीत गावरान ज्वारीची ५० ते ६० क्विंटलची आवक झाली. दर १८०० ते २७०० रुपयांचा मिळाला. बाजरीची १५ ते २० क्विंटलची आवक होऊन ११०० ते १३०० रुपयांचा दर मिळाला. तुरीची १२० ते २०० क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटल ५२०० ते ५६०० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची दहा ते पंधरा क्विंटलची आवक होऊन ३ हजार पाचशे ते ४ हजार पाचशे,  मुगाची पाच ते दहा क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार रुपये, गव्हाची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ७७५ रुपयाचा दर मिळाला. 

सोयाबीनची ३० क्विंटलची आवक होऊन ३८०० ते ४ हजार २२५ रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची आवक ही बऱ्यापैकी होत आहे. मिरचीची दर दिवसाला २५ ते ४० क्विंटलची आवक होऊन चार हजार ५५० ते १२ हजार ६१० रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात दर दिवसाला गुळाची १०७ क्विंटलची आवक होऊन २५०० ते ३००० रुपयाचा दर मिळाला. 

भाजीपाल्याची आवक दर सातत्याने कमी जास्त झाल्याचे पाहायला मिळाले. टोमॅटोची ७० क्विंटल आवक होऊन दोनशे ते चारशे, वांग्यांची २३ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १०००, काकडीची १८ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते १ हजार ५००, गवारीची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते ६ हजार, दोडक्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, बटाट्याची २३० ते २५० क्विंटलची आवक होऊन १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये, हिरव्या मिरचीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. 

शिमला मिरचीला १००० ते १५०० रुपये

शिमला मिरचीची २० ते २२ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला.  मेथी, पालक, शेपू, कढीपत्ता, कोथिंबीर,  मक्याच्या कणसांचीही आवक बऱ्यापैकी होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com