नगर : कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे रुपयांनी सरासरी वाढ 

बुधवारी (ता. २२) झालेल्या लिलावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे रुपयांनी सरासरी वाढ  Per quintal in onion An average increase of two hundred rupees
कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे रुपयांनी सरासरी वाढ  Per quintal in onion An average increase of two hundred rupees

नगर : बाजार समित्यांत कांद्याची आवक कमी झालेली असतानाही कांदादरात वाढ होत नव्हती. उलट मागील आठवड्यात २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल दर घसरल्याने शेतकरी हतबल झाले. बुधवारी (ता. २२) झालेल्या लिलावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. घोडेगाव तालुका नेवासा येथील बाजार समितीत कांद्याची साधारण सरासरी दोनशे रुपये प्रति क्विंटलने दरात वाढ झाली आणि प्रति क्विंटल २१०० रुपयापर्यंत दर मिळाला. काही गोण्या कांद्याला अडीच हजार रुपयापर्यंत दरही मिळाला.  नगर जिल्ह्यातील नगर पारनेर घोडेगाव राहाता राहुरी अकोले संगमनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव होतात. नगर, घोडेगाव आणि पारनेर बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून या दरात मात्र फारशी वाढ होताना दिसत नव्हती तू नही दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले. मागील आठवड्यात तर प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी दर आहेत घट झाली. काल माता कांद्याच्या दराने बाजारात काहीशी उसळी मारली. घोडेगाव बाजार समितीत बुधवारी ४६ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. सुरुवातीला १७०० ते २१००चा भाव निघाला. नंतर काही कांद्याला अडीच हजार ते सत्तावीसशे रुपये भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com