agriculture news in marathi Raab bhajani works started in Igatpuri taluka | Agrowon

इगतपुरी तालुक्यात राब भाजणीची कामे सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

आदिवासी भागात शेतकरी राब भाजणीसाठी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. यासाठी गवत, सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात. यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच. शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. 
- शांताराम शेलार, शेतकरी, त्रिंगलवाडी 

इगतपुरी, जि. नाशिक : सध्या लॉकडाऊन असले तरी आदिवासी, दुर्गम शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात आहे. या दिवसांत सहसा मजुरीवर जाणारा नागरिक लॉकडाऊनमुळे घरी बसला आहे. त्यातच शेतीची कामे सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी जमिनीच्या राब भाजणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. 

नागली, भात, वरई पिकांसाठी आदर लावण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, पुरेपूर दक्षता घेऊन सामाजिक अंतर पाळून शेतातील कामासाठी शेतकरी वेळ देत आहेत. 

लॉकडाउनचा परिणाम प्रामुख्याने शहरी भागात जास्त प्रमाणावर दिसून येत आहे. एकीकडे मजुरटंचाई असली, तरी शेतकरी आपापसात कामाचे नियोजन करून शेतीकामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. ज्यांचा रोजगार शेतीवर अवलंबून आहे. त्यांना ग्रामीण भागातच थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे शेतीची तयारी होण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होत आहे. 

राब भाजणी..

आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र, अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. जमीन भाजली जाते. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...