रब्बीत महिलांच्या शेतीशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Rabbbi season in response to women's agriculture
Rabbbi season in response to women's agriculture

अकोला ः जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला असून परतीच्या पावसाने रब्बीला फायदा झालेला आहे. कृषी विभागाने या हंगामासाठी विविध पातळ्यांवर नियोजन केले असून यात महिलांच्या खास शेतीशाळांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. आत्मा यंत्रणाच्या माध्यमातून ठिकठिकाणी अशा शेतीशाळा होत असून महिलांची लक्षणीय उपस्थिती खास आकर्षण ठरत आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी पुढाकार घेत रब्बीसाठी अशा प्रकारच्या शेतीशाळांबाबत यंत्रणांना सूचना केली होती. त्यानुसार महिला कृषी सहायकांची निवड केलेल्या गावांमध्ये संलग्न शेतीशाळा, प्रात्यक्षिक व क्रॉपसॅप योजनेत लाभार्थी निवड करून हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्याचे सुचविण्यात आले. रब्बी हंगामात जिल्ह्यात ३३ महिला शेतीशाळा होत आहेत.

शेती क्षेत्रात महिलांना सुद्धा आधुनिक शेतीविषयी माहिती या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने हरभरा पिकाची महिलाची शेतीशाळा मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे घेण्यात आली. या वेळी सरपंच जयश्री मेहरे, विषयतज्ज्ञ डॉ. चारूदत्त ठिपसे, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी सुहास बेंडे, संदीप गवई उपस्थित होते. जिल्ह्यात हरभरा पिकाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, आत्मा व पोकरा प्रकल्पातून ३०३ शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या. १६ आठवडे चालणाऱ्या या शेतीशाळा १ मार्चपर्यंत चालणार आहेत. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यांत कार्यरत महिला कृषी सहायकांना ३३ शेतीशाळांची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक महिला शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, घाटे अळीचे नियंत्रण, निरीक्षण घेण्याच्या पद्धती, फेरोमोन ट्रप व पक्षी थांबे लावल्यास होणारे फायदे याविषयी तांत्रिक माहिती देऊन त्यांचे प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com