मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर रब्बी

Rabbi on 14 lakh 55 thousand hectares in Marathwada
Rabbi on 14 lakh 55 thousand hectares in Marathwada

उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख ५५ हजार ९० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद कृषी विभागातील ५ लाख ३१ हजार हेक्‍टरसह लातूर कृषी विभागातील ९ लाख २३ हजार हेक्‍टरवर रब्बी पिकांचा समावेश आहे. 

औरंगाबाद येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ५ लाख ३१ हजार ५८२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी उरकली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६६ टक्‍के पेरणी उरकल्याचे कृषी विभागाचा अहवालातून समोर आले आहे.  

लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्‍टर आहे.  त्यापैकी ९ लाख २३ हजार ५०८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी उरकली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३ टक्‍के पेरणी उरकल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात ४४.२५ टक्‍के, जालना ८५.५६ टक्‍के, बीड ६८.६७ टक्‍के, उस्मानाबाद ८३ टक्‍के, परभणी ५७ टक्‍के, हिंगोली ७०, लातूर जिल्ह्यात ११६, तर नांदेड जिल्ह्यात १०५ टक्‍के क्षेत्रावर ही पेरणी आटोपली आहे.

खरीप हातचा गेल्याने आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवरच अवलंबून आहेत. थंडी व कीड रोगांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रब्बीवर संकटाचे ढग आहेतच. त्यामुळे निदान हा हंगाम तरी शेतकऱ्यांना साथ देईल का, हा प्रश्‍न   आहे.  

जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

औरंगाबाद ९२२१४
जालना १४९९८४
बीड  २९०२७४
लातूर २२६७२९
उस्मानाबाद २७६६२१
नांदेड १४३९६४
परभणी १७२१००
हिंगोली १०४१३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com