Agriculture news in marathi; Rabbi Agricultural Fair at Karada Agricultural Science Center | Agrowon

करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी मेळावा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

अकोला ः परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वाशीम जिल्ह्यात या पावसामुळे सोयाबीन, हळद, भाजीपाला व फळपिकांना मोठा फटका बसला. मशागतीची कामे लांबल्यामुळे रब्बी हंगामातील पूर्व तयारी लांबली आहे. ही बाब लक्षात घेत रब्बी हंगामात लागवड तंत्राचे मार्गदर्शन करण्यासह पावसामुळे उद्भवलेल्या विविध पीक समस्यांचे निराकरण करण्याकरिता करडा कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने सोमवारी (ता. ११) रब्बी कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला ः परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. वाशीम जिल्ह्यात या पावसामुळे सोयाबीन, हळद, भाजीपाला व फळपिकांना मोठा फटका बसला. मशागतीची कामे लांबल्यामुळे रब्बी हंगामातील पूर्व तयारी लांबली आहे. ही बाब लक्षात घेत रब्बी हंगामात लागवड तंत्राचे मार्गदर्शन करण्यासह पावसामुळे उद्भवलेल्या विविध पीक समस्यांचे निराकरण करण्याकरिता करडा कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने सोमवारी (ता. ११) रब्बी कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी मारोतराव लादे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्राचे  प्रभारी अधिकारी डॉ. विकास गौड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, विषय तज्ज्ञ आर. एस. डवरे, एन. बी. पाटील, टी. एस. देशमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. काळे यांनी रब्बी मेळाव्याचे महत्त्व पटवून सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. मानवी आरोग्य व शेतीचे आरोग्य अबाधित राखण्याकरिता एकात्मिक शेती पद्धती कशी फायदेशीर आहे हे पटवून दिले. अध्यक्षस्थानावरून मारोतराव लादे यांनी मेळाव्याच्या आयोजनामुळे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान विषयी माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. गौड यांनी रब्बी ज्वारी घेण्याचे फायदे, बीज प्रक्रियेचे महत्त्व, नवीन सुधारीत वाण, पेरणीचा कालावधी याविषयी माहिती देत शेतकऱ्यांनी ओवा, कोथिंबीर, जवस या पिकाच्या लागवडीचा सुध्दा विचार करावा असे सांगितले. जवस व करडई तेलाच्या विक्री करिता लाकडी तेल घाणा पद्धतीचा वापर सोयीचा व अधिक नफा देणारा ठरत असल्याचे सुचविले. 

कीटकशास्त्रज्ञ डवरे यांनी अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत हळद पिकात कंदमाशीचे व्यवस्थापन तसेच तुरीचे कीड व्यवस्थापन आणि वाण बदल, कामगंध सापळे, पिकांची फेरपालट या विषयी सविस्तररित्या तांत्रिक माहिती दिली. टी. एस. देशमुख यांनी रब्बी पिकाचे सुधारीत लागवड तंत्राबद्दल बोलताना काबुली हरभरा, सरी वरंबा पध्दत, खत व्यवस्थापन व विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्राची माहिती दिली. 

एन. बी. पाटील यांनी हळदीच्या विविध वाणाचे प्रयोग व मिळालेल्या उत्पन्नाबाबत माहिती देताना सिंचन व्यवस्थापनाचे महत्त्व व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणे सुचविले. तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून एस. के. देशमुख यांनी आभार मानले.


इतर बातम्या
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...