agriculture news in marathi, rabbi crop loan distribution status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के पीककर्ज वितरण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीअखेर अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित अडीच महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.

सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीअखेर अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित अडीच महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १०१२.८८ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १५ जानेवारीअखेर १०० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. साडेतीन महिन्यांत अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले आहे. रब्बी हंगामात पीककर्ज वितरणात  सर्व बँकांची धोरणे उदासीन आहेत. खरिपात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रब्बीत पीक कर्ज वितरणाकडे बँकांनी दुर्लक्ष केले असल्याने वितरणाचा आकडा कमी झाला आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांना ४३९ कोटी ८० लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, यापैकी ३२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सात टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांत बॅंक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक ११ कोटी ३६ लाखांचे पीककर्ज वितरण केले आहे. या बँकेने १२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँकांपैकी १० बँकांनी शून्य टक्के कर्ज वाटप केले आहे. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी १९ टक्के म्हणजेच २४ कोटी ४ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ४३ कोटी ९९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी आठ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन साडेतीन महिने उलटले असून, कर्ज वितरण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्ज वाटप होईल हे पाहावे लागणार आहे. 

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पाठ 
जिल्ह्यातील अनेक भागांस तीव्र दुष्काळाच्या झळा बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पुर्वीचेच कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज घेतले जात नाही. तसेच पीक कर्जमाफी बाबतच्या चर्चांमुळे अनेक शेतकऱ्यांचा कर्ज न भरण्याकडे कल वाढला आहे. पीक कर्जाबाबत बॅँकाची धोरणे उदासीन असल्याने एकूण कर्ज वितरणावर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.  

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...