Agriculture news in marathi Rabbi crops on 8.5 lakh hectares in Aurangabad, Jalna and Beed districts | Agrowon

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ लाख हेक्‍टरवर रब्बीची पिके

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत आजवर ८ लाख ८३ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०९ टक्‍के क्षेत्रावर ही पेरणी आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार ११८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत १११ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २ लाख ३१ हजार ८४२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये ६० हजार ४०८ हेक्‍टरवरील ज्वारी, ८३ हजार ६३९ हेक्‍टर गहू, २५ हजार ७३९ हेक्‍टरवरील मका, ५९ हजार ३४० हेक्‍टरवरील हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत आजवर ८ लाख ८३ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०९ टक्‍के क्षेत्रावर ही पेरणी आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार ११८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत १११ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २ लाख ३१ हजार ८४२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये ६० हजार ४०८ हेक्‍टरवरील ज्वारी, ८३ हजार ६३९ हेक्‍टर गहू, २५ हजार ७३९ हेक्‍टरवरील मका, ५९ हजार ३४० हेक्‍टरवरील हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. 

जालना जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. या क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ७७ हजार ८२६ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १५९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीची ९५ हजार ८०४ हेक्‍टरवर, गहू ७० हजार ८२६ हेक्‍टर, २१ हजार९०९ हेक्‍टरवरील मका, ८६ हजार ९५७ हेक्‍टरवरील हरभरा, ३२१ हेक्‍टरवरील करडई, १० हेक्‍टरवरील जवस, १३ हेक्‍टरवरील सुर्यफूल आदी पिकांचा समावेश आहे. 

बीड जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर होते. या क्षेत्राच्या तुलनेत ८८ टक्‍के अर्थात ३ लाख ७३ हजार ६०४ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. या क्षेत्रात १ लाख ८६ हजार ५५१ हेक्‍टरवरील ज्वारी, ३५ हजार ७४४ हेक्‍टरवरील गहू, ३१२८ हेक्‍टरवरील मका, १ लाख ४७ हजार ५८९ हेक्‍टरवरील हरभरा, ३८७ हेक्‍टरवलील करडई, ११२ हेक्‍टरवरील जवस आदी पिकांचा समावेश  असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...