agriculture news in marathi, rabbi crops area may increase in akola, washim, maharashtra | Agrowon

अकोला, वाशीममध्ये रब्बी पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पाऊस चांगला झालेला असून परतीच्या पावसाचीसुद्धा शक्यता अाहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याचे कृषी विभागाचे नियोजन अाहे. तशा सूचना देण्यात अाल्या अाहेत.

- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला .

अकोला  ः यंदा अकोला, वाशीम जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून धरण प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा अाहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यांत रब्बीचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात अाहे. दुसरीकडे लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाला असून परतीच्या पावसानेही आतापर्यंत पुरेसा दिलासा दिलेला नाही. यामुळे तेथे रब्बीबाबत साशंकता निर्माण होऊ लागली अाहे. नियोजनाच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणासुद्धा सध्या चाचपडत अाहेत.

अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या दृष्टीने पोषक स्थिती अाहे. शिवाय गेल्या अाठवड्यात दोन दिवस काही भागात दिलासादायी पाऊस झाला. यामुळे रब्बीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता अाहे. अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अधिक क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जात अाहे. प्रामुख्याने हरभरा पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात अाहे. दोन्ही जिल्हे मिळून हरभऱ्याची सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणार अाहे. यानंतर गव्हाचे क्षेत्र लागवडीखाली येईल.

हरभऱ्याच्या क्षेत्रातील वाढ लक्षात घेता बाजारपेठेत बियाणे, खतांची उपलब्धता करून दिली जात अाहे. सध्या उडीद हंगाम सुरू असून सोयाबीनची काढणीसुद्धा लवकर सुरू होईल. सोयाबीन काढणीनंतर अाॅक्टोबरमध्ये सरसकट रब्बी पेरणीला सुरवात होणार अाहे. रब्बीसाठी अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांमधील काही प्रकल्पांमधून पाणी देण्याचे नियोजनसुद्धा अंतिम टप्प्यात अाहे.
 
बुलडाण्यात परतीच्या पावसावरच रब्बी अवलंबून
बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के कमी पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत केवळ ४६५ मिमी पाऊस पडलेला अाहे. परिणामी खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले अाहे. अाता परतीचा पाऊस जोरदार झाला तर रब्बीच्या दृष्टीने फायदेशीर होऊ शकेल. परतीच्या पावसावरच या जिल्ह्यातील रब्बी हंगाम अवलंबून अाहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...