नांदेड, परभणी, हिंगोलीत रब्बी पिकांचे पावसामुळे नुकसान

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) सांयकाळी तसेच रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडात झालेल्या पावसामुळे काढणी सरू असलेल्या तसेच उभ्या रब्बीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Rabbi crops damaged in Nanded, Parbhani, Hingoli due to rain
Rabbi crops damaged in Nanded, Parbhani, Hingoli due to rain

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) सांयकाळी तसेच रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडात झालेल्या पावसामुळे काढणी सरू असलेल्या तसेच उभ्या रब्बीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जलधारा, दहेली मंडळांत हदगाव तालुक्यातील हदगाव, तामसा, मनाठा, निवघा, तळणी, आष्टी मंडळात पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड मंडळात तसेच अन्य तालुक्यातील काही मंडळात हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील २१ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. बामणी (ता. जिंतूर) मंडळात सर्वाधिक १७ मिमी पाऊस झाला. 

परभणी तालुक्यातील सर्व परभणी, परभणी ग्रामीण, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, दैठणा, जांब, झरी आठ मंडळे, जिंतूर तालुक्यातील सर्व बोरी, जिंतूर, आडगाव, सावंगी म्हाळसा, बामणी, चाराठणा या सहा मंडळे, सेलू तालुक्यातील सेलू, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, आवलगाव या दोन मंळांत गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड, राणीसावरगाव, महातपुरी, मंडळ या मंडळात, पालम तालुक्यातील बनवस मंडळात पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तसेच वसमत तालुक्यातील काही मंडळांत पाऊस झाला. सध्या या तीन जिल्ह्यांत ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची सुगी सुरू आहे. उशीरा पेरणी केलेली पिके उभी आहेत. कापणी करुन शेतात असलेली पिके भिजत आहेत. वादळी वाऱ्यामुळे उभी पिके आडवी होत आहेत. संत्रा, मोसंबी आदी फळासह भाजीपाला पिकांचे पाऊस, वादळामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com