मराठवाड्यात ३३ टक्केच रब्बी पिके

मराठवाड्यात ६ लाख हेक्‍टरवरच रब्बी पिके
मराठवाड्यात ६ लाख हेक्‍टरवरच रब्बी पिके

औरंगाबाद : दुष्काळाचा आघात यंदा मराठवाड्याच्या रब्बीवर झाला आहे. मराठवाड्यातील सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३२.६८ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ लाख ४ हजार हेक्‍टरवर पेरणी झालेल्या हरभऱ्यासह २ लाख ४५ हजार हेक्‍टरवर पेरणी झालेल्या रब्बी ज्वारीच्या पिकाचा समावेश आहे.

मराठवाड्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ८६ हजार ५४० हेक्‍टर इतके आहे. यंदा या सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ६ लाख १६ हजार ४८१ हेक्‍टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. केवळ ३२.६८ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, पाण्याचीही उपलब्धता पेरणी झालेल्या रब्बी पिकाच्या शाश्वत उत्पादनात मोठा अडथळा बनू पाहत आहे.

कृषी विभागाच्या लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ११ लाख १४ हजार २३१ हेक्‍टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्या तुलनेत या पाचही जिल्ह्यात ४२.६९ टक्‍के अर्थात ४ लाख ७५ हजार ७०९ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण ७ लाख ७२ हजार ३०९ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १८.२३ टक्‍के, अर्थात १ लाख ४० हजार ७७२ हेक्‍टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा पिकाची उगवण बऱ्यापैकी झाली असून, ते पीकवाढीच्या अवस्थेत आहे. औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतर्गत काही ठिकाणी अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात वाढीच्या अवस्थेतील हरभऱ्याला काही ठिकाणी फुलेही लागत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात केवळ १२ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात यंदा रब्बीची पेरणी अपेक्षित क्षेत्रावर होऊ शकली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १२.१२ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात १६.५९ टक्‍के, जालना जिल्ह्यात ३२.१० टक्‍के, परभणीमध्ये ३०.५९ टक्‍के, हिंगोलीत २९.०२ टक्‍के, लातूरमध्ये ५०.६ टक्‍के, उस्मानाबादमध्ये ४८.१८ टक्‍के, तर नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६०.५३ टक्‍के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com